आजपासून दापोरी येथे श्री संत लालदासबाबा पुण्यतिथि महोत्सवास् सुरुवात

0
910
Google search engine
Google search engine
मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावाला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले . त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे . श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा ९९ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात दापोरी नगरीत संपन्न होत आहे .
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा कारण्याकरिता दापोरी नागरीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविक सहभागी होत असून चैत्र शुद्ध चतुर्थीला लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक करून तिर्थस्थापणेने या सप्ताहाची सुरुवात होते . फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात काकडा , आरती , भागवत प्रवचन , हरिपाठ , अखंड विना वादन , कीर्तन , आरती , भजन , यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात . दापोरी नगरीमध्ये लालदासबाबा बद्दल श्रद्धेची भावना असून या पावन भूमीत भव्य पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या भक्तांची प्रचंड वर्दळ असते .
दापोरी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदास बाबा यांचा ९९ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी नगरीमध्ये सालाबादा प्रमाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु होणार असून ह भ प श्री माउली महाराज मुरेेकर ( आळंदीकर ) भागवताचार्य यांच्या मधूर वाणीतून होणार असून या भव्य पुण्यतिथी महोत्सवानिमित्य निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी नगरी मधे आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून रोज हरिपाठ ,काकड़ा आरती , सत्संग , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना , खंजेरी भजन , अवधुति भजन , यासारखे विवध धार्मिक कार्यक्रम बाराही महिने सुरु राहत असून या भगवत सप्ताहाला रोज हजारो भक्तांचा प्रतिसाद मिळत असून दापोरी नगरीमधे ९ तारखेला लालदास बाबा यांच्या पालखिचि भव्य शोभा यात्रा निघणार असून लालदास बाबा यांच्या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार आहे .
लालदास बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संखेणे उपस्थित राहन्याचे आवाहन लालदास बाबा संस्थान चे अध्यक्ष , उपाध्यक्ष , कार्यकारिणी मंडळ, व दापोरी येथील समस्त गावकारी मंडळी यांनी केले आहे .