चिऊ ये,काऊ ये..!दाना खां, पाणी पे!!

0
1292

विटाळीच्या जि.प.शाळेच्या चिमुकल्यांचा अनोखा दाना पानी उपक्रम

आकोट/प्रतिनिधी
उन्हाळ्याची दाहकता व दिवसेंदिवस वाढत असलेले उष्णतामान व त्यातच पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता शाळेतील झाडांवर येणा-या पक्षांसाठी दाना पाण्याची सोय व्हावी म्हणून विटाळी येथील शालेय चिमुकल्यांनी अनोखा उपक्रम राबवून संवेदनशीलतेचा परिचय घडविला आहे या उपक्रमाचे गांवक-यांनी मोठे कौतुक केले आहे.
जिल्हा परिषदेच्या येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय प्रांगणातील वृक्षांवर घरटे करुन राहणा-या पक्षांसाठी पाणेरी व अन्न दाना उपलब्ध करुन दिले.आहे.त्यासाठी कुठलाही खर्वृच न करता हा उपक्रम या शाळेने राबविला आहे हे विशेष

वृक्ष आणि पशूपक्षांवर प्रेम करा .उन्हाळ्यातील वाढते तापमान व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून पक्षांना पक्षांना वाचूया.. या उदात्त हेतूने झाडावर पाणी आणि अन्नदाना पाण्याची सोय केली आहे.प्रांगणातील झाडांवरील पक्षांच्या सुरक्षेची व त्या दाना पाण्याची सोय करतांना या मुलांच्या अंतरंगातील भूतदया व संस्कार मुल्य रुजविणारे येथील शिक्षकवृंद देखील अभिनंदनास पात्र ठरले आहे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या स्त्युत्य उपक्रमाचे उद घाटन
कु.ईश्वरी शं.नारे हिचे हस्ते तर कु.भक्ती गजेन्द्र च-हाटे,कु.आनंदी गिते यांचे उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी कु.नंदिनी दामोदर,चि.कृष्णा नारे,चि.विक्रम राजगुरु,चि.नवल इंगळे यांनी भाषणे देऊन भूतदयेवर प्रकाश टाकला.संचालन कु.प्रगती च-हाटे हिने तर आभार कु.राधा ऩारे हिने मानलेत.यावेळी विद्यार्थी व शिक्षकद्वय राममुर्ती वालसिंगे व पंकज जोत तसेच शापोआ मदतनिस सुरेश वाघमारे पालक उपस्थित होते.