माधान येथील आश्रय कन्या रेखा हिचा लग्नसोहळा थाटात संपन्न टोम्पे दांपत्याने केले कन्यादान

0
1249
Google search engine
Google search engine

माधान येथील आश्रय कन्या रेखा हिचा लग्नसोहळा थाटात संपन्न टोम्पे दांपत्याने केले कन्यादान

बादल डकरे

चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथील कस्तुरबा आश्रम शाळेत असलेल्या रेखा हिचा विवाह मोठ्या थाटात आणि आनंदोत्सवात पार पडला. यावेळी या लग्नसमारंभाला अनेक व्यक्तीने वऱ्हाडी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. या विवाहसोहळ्या ला तालुक्यातील वरळी येथील रहिवासी चिरंजीव शैलेश याच्यासोबत झाला असून यावेळी या मुलीचे कन्यादान सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे टोम्पे महाविद्यालयाचे सचिव भास्कर टोपे यांच्या पत्नी मनीषा टोम्पे यांनी केले.तसेच चांदुर बाजार तालुक्यातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करण्यात आला. तर तिच्या भावाची जबाबदारी पोलिस पाटील त्यांनी पार पडली.यावेळी कस्तुरबा आश्रमशाळेतील तारा भवन येथे या सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याला गावातील तसेच चांदूरबाजार तालुक्यातील अनेक नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली चांदूरबाजार चे ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांनी सुद्धा या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी या लग्न समारंभाला बाळासाहेब पटवर्धन, रवी संगेकर,कमल जी हरकूट,जेष्ठ पत्रकार मदन भाटे,तसेच अनेक तालुक्यातील नामकीत व्यक्ती उपस्थिती होती.तर या लग्न सोहळ्याला महिलांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.