स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ची चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही

जाहिरात
Slider

स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ची चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही.

बादल डकरे

      चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे याना उधाण आल्याची बातमी  दिनांक 1 एप्रिल 2019 ला प्रकाशित केली.याची दखल घेत अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील हिरुळपुरणा या ठिकाणी गोपनीय माहिती च्या आधारे कार्यवाही केली.या कार्यवाही मध्ये स्थानिक गुन्हे शाखाने दोन आरोपी याना अटक आहे.                                                              1)आरोपी अशोक माणिकराव सुलताने रा.हिरुडपूर्णा यांचे कडून  40 लिटर गावरनी दारू कीं  अंदाजित 6,000  रु. चा माल आणि दुसरी कार्यवाही मध्ये केली असता 2) मोहन संजय कुरवाडे रा.हिरुडपूर्णा यांचे कडे 24 बॉटल कीं रु.1200 रु चा देशी दारू मिळून आले.या दोन्ही कार्यवाही दिनांक 2 एप्रिल ला सायंकाळी 8 ते 9 च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम ने केली.

तर दिनांक 1 एप्रिल ला दुपारी 2 च्या सुमारास चांदुर बाजार शहरातील ताज लाइन येथे गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या याच टीम ने वरली मटका वर कार्यवाही केली.
या कार्यवाही मध्ये आरोपी 3) मो.जावेद मो.अफसर वय 28 रा.चादूर बाजार यांचे कडून वरळी मटका साहित्य 06,50 रु.चा माल पकडला.त्याला अटक करून चांदुर बाजार पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले.आणि गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली.  सदर ची कारवाई ही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दिलीप झलके , अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्याम घूगे यांचे मार्गदर्शनात *गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे ,सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद एस.कवाडे यांच्या टीम ने केली.

बॉक्समध्ये
*’*अमरावती गुन्हे शाखेचे टीम चांदुर बाजार मध्ये येऊन कार्यवाही करीत आहे मग स्थानिक पोलीस यावर कार्यवाही का करीत नाही अशी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाही नंतर शहरात चर्चा सुरू झाली आहे.’*

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।