निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना यांची माध्यम कक्षास भेट

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 44 सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) आशिष सक्सेना यांनी आज माध्यम कक्षास भेट देऊन पाहणी केली.यावेळी भूसंपादन अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना यांचे स्वागत करून जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली. माध्यम कक्षात पेड न्यूजच्या संनियंत्रणासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. माध्यम कक्षात इलेक्ट्रॉनिक माध्यमातील राजकीय जाहिराती व पेड न्यूजच्या संनियंत्रणासाठी 2 दूरचित्रवाणी संच, 2 रेडिओ संच, 4 संगणक संच आदिंची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मुद्रित माध्यमांवरही नजर ठेवण्यासाठी दररोज स्थानिक वृत्तपत्रे तपासली जातात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातील राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही केली जाते. तसेच, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वेळोवेळी समन्वय साधला जातो.00000