वर्धा लोकसभा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी रामदास तडस यांना बजावली नोटीस – टी. व्ही. ९ च्या स्टींगवर मागितला खुलासा

0
1609
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
२०१४ वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी १० कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी २५ कोटी रुपये खर्च करेन व डमी उमेदवार उभे करण्यासाठी ४-४ कोटी रुपये खर्च केल्याचेही वर्धेचे भाजप खासदार रामदास तडस यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटल्याचा दावा टी. व्ही. ९ या वृत्तवाहिनीने केला आहे. ही बातमी प्रसारीत होताच वर्धा लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी खा. रामदास तडस यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे.
खा. रामदास तडस यांच्या स्टींग ऑपरेशनची बातमी टी.व्ही. ९ वृत्तवाहिनीने प्रसारीत करताच राज्य निवडणुक आयोगाने वर्धा लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी यांना या प्रकरणाचा तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वर्धा लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी खा. रामदास तडस यांना या प्रकरणाबाबत नोटीस बजावुन लवकरात लवकर खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्याची माहिती वर्धा लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिली आहे. खुलासा प्राप्त होताच व या व्हीडीओची चौकशी करून आक्षेपार्ह आढळले तर खा. तडस यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.