खा. तडस यांनी टी. व्ही. ९ विरोधात वर्धेच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली तक्रार – खोडसाळ बनावटी व बदनामीकारक वृत्त प्रसारीत केल्याचा आरोप

0
1110
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
३ एप्रिल रोजी टी. व्ही. ९ मराठी वृत्त वाहिनीने माझ्या बाबतीत अतिशय खोडसाळ बनावटी व बदनामीकारक वृत्त प्रसारीत केल्याची तक्रार वर्धा लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार खा. रामदास तडस यांनी वर्धा पोलीस स्टेशनला दिली आहे.
टी. व्ही. ९ या वृत्तवाहिनीच्या स्टिंगमधून महाराष्ट्रातील वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला होता. २०१४  वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी १० कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी २५ कोटी रुपये खर्च करेन, असे भाजप खासदार रामदास तडस यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटल्याचा दावा वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच, डमी उमेदवार उभे करण्यासाठी ४-४ कोटी रुपये खर्च केल्याचेही भाजप खासदार रामदास तडस यांनी कबुल केल्याचे सांगितले. यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. परंतु मी कधीही टी. व्ही. ९ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला माझ्याविरुद्ध प्रसारित केलेल्या बातमीतील मजकुर बोललेलो नाही. मात्र या क्लिप मध्ये जे संभाषण दिसते ते संभाषण सर्वसाधारण स्वरूपाचे होते. ते कुठल्याही एका बाबीवर किंवा कुठल्या विशिष्ठ  व्यक्तीशी संबधीत नव्हते. तसेच ते माझ्याबद्दलही नव्हते. ज्या कोणी ही क्लीप टी. व्ही. ९ या न्युज वाहिनीला तयार करून दिली आहे. ती जोड -तोड करून (ईडीटींग) खोटी व बनावट तयार केल्याची तक्रार खा. रामदास तडस यांनी वर्धा येथील राम नगर पोलीस स्टेशनला बुधवारी सायंकाळी दिली. पुढे या तक्रारीत खा. तडस यांनी म्हटले की, सध्या मी वर्धा लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहो. व प्रचारात व्यस्त आहो. ही संधी साधून माझे विरुद्ध संबंधीत वाहिनीने कटकारस्थान करून माझी बदनामी करण्याकरिता सदरची बातमी प्रसारित केली आहे. सदरच्या बातमीमुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये माझ्याबाबत गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने जाणून-बुजून सदरचे खोटे व बनावटी वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. सदर वृत्तवाहिनीवर माझी बदनामी केल्याबद्दल व माझी प्रतिष्ठा मालिन करण्याच्या  कृत्याबद्दल ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच सदर क्लीप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावी व या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी रामदास तडस यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातुन काय साध्य होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.