कडेगावातील १८० वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली श्रीराम जन्म उत्सव सोहळा!

Google search engine
Google search engine

आजच्या विज्ञान युगात किंवा जगात संस्कृतीचा चांगल्या परंपरांचा,नितीमत्तेचा विचार केला तर त्यामध्ये आपला भारतदेशच श्रेष्ठ मानावा लागेल हे स्वामी विवेकानंदांनी जगाला पटवूनही दिले आहे.व जगानेही ते त्यावेळी मान्य केले आहे.जगातील तमाम जनतेलाही ते पटले आहे.सर्व गोष्टी पेक्षा चांगली नितीमत्ताच श्रेष्ठ आहे व ती सर्व गोष्टींचे अधिष्ठान आहे.महाराष्ट्र याबाबतीत वेगळा वाटतो.महाराष्ट्रात अजुनही नितीमत्ता संस्कृती आहे.त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली हजारो वर्षापुर्वीची गौरवशाली परंपरा व इतिहास होय.वेद अरण्यके,ब्राम्हण्ये उपनिषदे,रामायण,महाभारत अशा अनेक महाकाव्यांनी,साहित्यांनी व ती निर्माण करणाऱ्या महान ऋषी मुनींनी संत महात्म्यांनी त्यातुन निर्माण केलेली परंपरा अजूनही चालू आहे ती म्हणजे कडेगावमधील श्रीराम मंदीरातील राम जन्मोत्सव सोहळा.(रामनवमी) सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे श्रीराम मंदिरात गेली १८० वर्षे जोपासलेली वैभवशाली परंपरा जोमाने चालविली आहे वाढविली आहे ती म्हणजे (रामनवमी) रामजन्म सोहळा! अजुनही राम जन्माला येतो.व अयोध्येसारखे हे कडेगांव मोहरते. १८० वर्षांपुर्वी देशपांडे( इनामदार) यांचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर होते.परम भक्त हरीबुवा माटे उर्फ राघवेंद्र स्वामी यांनी गावातील वास्तव्यात या मंदिरात त्यांनी केलेल्या रामायणावरील प्रवचनातुन व किर्तनातुन ग्रामस्थाना रामकथेची गोडी लावली.या भागात कडेगावात रामनवमी उत्सव समर्थ सांप्रदाया प्रमाणे सुरू करावा अशी आग्रहाची मागणी माटेबुवा यांचेकडे केल्यामुळे त्यांच्या पुढाकाराने कडेगांव मध्ये श्रीराम मंदीर उभे ठाकले.प्रभुरामचंद्र,सितामाई, व बंधु लक्ष्मण यांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना झाली.वर्षानुवर्षे त्यांची नित्यनियमाने पुजा सुरू झाली १८० वर्षांपूर्वी म्हणजे शके..१७६१..‌… मध्ये या उत्सवास प्रारंभ झाला.प्रतिपदे पासुन दशमी पर्यंत व हनुमान जयंती या प्रत्येक वाराची (तिथीची)संपुर्ण दिवसाची व्यवस्था करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली व गेली १८० वर्ष पिढ्यान पिढ्या अविरत अखंड पालन होत आहे.उत्सव मुर्ती घेऊन कडेगावला येऊन उत्सव पार पाडण्याची जबाबदारी कै.रामकृष्णबुवा माटे व त्यांचे शिष्य कै.पंडीतबुवा यांनी अनेक वर्षे सांभाळली.आजही चार्टर्ड अकौंटंट(सी.ए) अभयजी माटे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहुन उत्सवमुर्ती घेऊन येतात.व ही परंपरा आनंदाने व निष्ठापुर्वक चालवित आहेत.श्री कलेकर स्वामी,श्री विष्णुबुवा सिध्द,आळंदीचे नृसिंह सरस्वती,पुण्याचे जंगली महाराज,श्री चौडे महाराज यांनी मंदीरात मुक्काम करून ग्रामस्थांना आशिर्वाद दिले.श्रीधर स्वामी,शिरोळकर स्वामी,वाडीचे जेरे स्वामी,कोल्हापुरचे घुघरे स्वामी, वाडीचे शंकर स्वामी,पुर्णानंद स्वामी,वसमतकर सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांच्या वास्तव्याने हे मंदीर पुनीत झाले आहे.यावर्षीचा हा १८० उत्सवाची सुरुवात शनिवार दि.०६/०४/२०१९ प्रतिपदा ते सोमवार दि.१६/०४/२०१९ श्रीराम रथ यात्रा असा आहे.शनिवार दि.०६/०४/२०१९रोजी सकाळी ९ वा. प्रतिपदेला उत्सवाचा शुभारंभ कडेगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन हसबनिस यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून होणार आहे.त्याच बरोबर दररोज रात्री ९.३०ते १२ वा.ह भ प वासुदेवबुवा बुरसे पुणे यांचे सुश्राव्य किर्तन,प्रवचन त्याच बरोबर शनिवार दि.१३/०४/२०१९ रोजी कडेगांव च्या प्रमुख मार्गावरून भव्य शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१४/०४/२०१९ सडेतोड भाष्य करणारे सुप्रसिद्ध जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे हिंदुस्थानची राजकीय स्थिती व जागतिक पातळीवरील परिणाम या विषयी सडेतोड व्याख्यान,काफीला प्रस्तुत शब्दसुरांची नाती सदानंद बेंद्रे,स्वानंद भुसारी स्वरूपा सामंत,विजय उत्तेकर मुंबई इत्यादी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.प्रतिपदा ते दशमी नित्य कार्यक्रमाशिवाय नवमीला दु.१२वा.पुराणातील व नंतर किर्तनातील जन्मसोहळा,वसंतपुजा असा कार्यक्रम असतो.दशमीला जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष व समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत भक्ती भावाने भिक्षा समर्पण करतात.एकादशीला रथाची शोभा अपुर्व असते.शिसवीच्या लाकडाच्या नक्षीदार अशा दोन मजली भव्य रथात रामपंचायतन विराजमान होते.रथाला कासरा बांधुन ओढण्यात येतो व वळणावर चाकाला पहार लावुन वळवण्यात गावातील अबालवृद्ध सहभागी होतात.दुपारी लळीताचे किर्तन व वारवाले,मानकरी व सेवेकरी यांना खारीक खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो.हा प्रसाद रविंद्र रणभोर व मकरंद रणभोर यांचेकडुन दिला जातो.व हणमंत देशपांडे व सदाशिव देशपांडे कुटुंबिया कडुन आणलेली हनुमानाची मूर्ती पुन्हा देशपांडे कुटुबियाकडे पोहचविल्या नंतर उत्सवाची सांगता होते.अशा या१८०व्या वैभवशाली परंपरा असलेल्या उत्सवास हार्दिक शुभेच्छा.