रेल्वेच्या अनेक प्रवाशी गाड्या रद्द

0
677
Google search engine
Google search engine

ग्रामीण भागातील प्रवासी होतील हाल

शेगांव:-उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये लग्नप्रसंग, सहलीकरिता बाहेरगावी जाण्याचे बेत आखले जात असतानाच आणि येणं निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे विभागाने गुरुवारी रद्द होणाऱ्या गाड्यांची यादी जाहीर केली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाहून नागपूर, मुंबई, हावडा, अलाहाबादमार्गे ये-जा करणाऱ्या या गाड्या ५ ते २० एप्रिल दरम्यान रद्द केल्या आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावरील यार्डचे नूतनीकरण, नवीन प्लॅटफार्म आणि तिसरा लोहमार्ग निर्मितीचे कार्य हाती घेतल्याने दरदिवशी आठ तासांचा मेगाब्लॉक राहील.

अंबा एक्स्प्रेसला फटका
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस (१२११२), अमरावती-सुरत एक्स्प्रेस (१९०२६), अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस (२२११८), भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (१२४०५), हावडा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (२२१२१), पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८४३), हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८३३) या गाड्यांचा समावेश आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल सहा गाड्यांच्या फेऱ्या २० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
अमरावती – भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामे पूर्ण करण्यासाठी दररोज तब्बल सहा ते आठ तासांचा मेगाब्लॉक राहील. त्यामुळे नागपूरहून बडनेरामार्गे भुसावळकडे ये-जा करणा-या बहुतांश रेल्वे गाड्या ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात अमरावती-मुंबई, अमरावती-सुरत, अमरावती-पुणे (वातानुकूलित), भुसावळ-गोंडवाना आदी प्रमुख रेल्वेगाड्यांचा समावेश आहे तर गाडी क्रमांक अप 51154 आणि डाउन 51153 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक अप 51182 व डाउन 51181 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 1 ते 23 एप्रिल तसेच गाडी क्रमांक अप 51286 व डाउन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. डाऊन 51187 भुसावळ-कटनी रद्द करण्यात आली आहे. एक्सप्रेसही रद्द पॅसेंजरसोबतच काही एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 11039/40 महाराष्ट्र एक्सप्रेस ही 6 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यत, 15018/17 काशी एक्सप्रेस 6 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यत, 11025/26 हुतात्मा एक्सप्रेस 5 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे.
पॅसेंजर गाड्यादेखील रद्द
भुसावळ-नागपूर, अमरावती-भुसावळ, नरखेड-भुसावळ, वर्धा-भुसावळ, मुंबई-भुसावळसह मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या जवळपास ३६ पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गरीब, सामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामांसाठी तब्बल १५ दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे अमरावतीहून भुसावळ मार्गे जाणाऱ्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे विभागाने रद्द होणाऱ्या गाड्यांची यादी जाहीर केली आहे.
रेल्वे विषयी सूचना :-
11039/40 महाराष्ट्र एक्सप्रेस, दि. 06/04/2019 ते दि.19/04/2019 पर्यंत रद्द राहील.
15018/17 काशी एक्सप्रेस देि.06/04/2019 ते दि. 19/04/2019 पर्यंत रद्द राहील.
11025/26 हुतात्मा एक्सप्रेस दि.05/04/2019 ते दि.19/04/2019 पर्यंत रद्द राहील

येणं हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे ने भुसावळ ते नागपूर ये – जा करणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत याचा खूप मोठा फटका ग्रामीण भागातील प्रवाश्यांना पडणार आहे.
भारत सरकारच्या हस्तरीत असलेले रेल्वे विभाग येणं निवडणुकीच्या वेळेस गाड्या रद्द करीत आहे, यामुळे ग्रामीण आणि सोबतच शहरी भागातील प्रवाश्यांना अर्थातच विदर्भाच्या मतदारांनी मतदान करायचे कसे ? असा प्रामाणिक प्रश्न पडला आहे. सणाच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर रद्द झालेल्या गाड्यांमुळे बरेच नवं मतदार म्हणजेच असे विद्यार्थी जे ग्रामीण भागातून शहरी भागात शिकत आहेत किव्हा काही कारणाने या गावावरून त्या गावी गेला आहे त्याला वापस येणे आणि मतदान करणे कुठल्या मार्गाने सोपं पडलं असतं ? रद्द असलेल्या तिन्ही प्रवासी गाड्यांमुळे मतदानाच्या दिवशीच गोची होणार आहे. कारण विदर्भातील अर्थातच बुलढाणा , अकोला, अमरावती या मतदासंघातील मतदान १८ एप्रिलला आहे.
एकीकडे भारतीय निवडणूक आयोग लाखो रुपये खर्च करून मतदान करा असे आव्हाहन करते पण येणं निवडणुकीच्या वेळी असे गाड्या रद्द करणे या काळाला कितपत पोषक ठरेल असा प्रश्न जनता विचारू लागली आहे
भूसावल ते नागपूर मार्गावरील तिन्ही पॅसेंजर प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत