संस्कारभारती द्वारा आकोटात आज पाडवा पूर्व संगीत संध्या .

0
1222
Google search engine
Google search engine

संस्कृती संवर्धन समितीसह जेसीआय व रोटरीचे आयोजन

आकोट/ता.प्रतीनिधी

स्थानिक अकोट शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून सर्व क्षेत्रातील कलाकारांची संस्था असलेली संस्कारभारती द्वारा पाडवा पूर्व संगीत संध्याचे आयोजन शुक्रवार दि.५एप्रील ला करण्यात आले आहे.मराठी वर्षाच्या स्वागता निमित्त संस्कृती संवर्धन समिती जेसीआय अकोट व अकेट रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने गवळीपुरा अकोट येथे दिनांक 5 एप्रिल रोज शुक्रवार सायंकाळी सहा ते दहा दरम्यान ही पाडवा पुर्व संध्या आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये कला रसिक प्रेक्षकांसाठी सुमधुर भक्ती संगीत, भावगीत, हिंदी चित्रपटातील गीते अकोट शहरातील स्थानिक कलावंत सादर करणार आहेत. तरी वरील संस्थांच्या वतीने सर्व नागरिकांना तथा कला रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ .तसेच रसिक जनतेने कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करावे तथा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा घ्यावा.असे आवाहन
संस्कृती संवर्धन समिती अध्यक्ष आनंद भोरे व संस्कार भारतीचे अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार जेसीआय अकोटचे अध्यक्ष निलेश हाडोळे व रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद गणोरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे .