संपतराव देशमुख दुध संघांच्या प्रगतीत कष्टकरी लोकांचे मोठे योगदान ःअपर्णाताई देशमुख

Google search engine
Google search engine

संपतराव देशमुख दूध संघाची स्थापना होवून वीस वर्ष होत आहेत. या संघाच्या भरभराटित कष्टकरी दुग्ध उत्पादक,दुध सोसायटी व या ठिकाणचे कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन ग्रीन पाँवर्स शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख. यांनी केले.
संपतराव देशमुख दुध संघाच्या स्थापनेस वीस वर्षे पुर्ण झाली या निमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन तानाजीराव जाधव होते.स्वागत व प्रास्ताविक दिपक मोहिते यांनी केले.
पुढे बोलताना अपर्णाताई देशमुख म्हणाल्या की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपतराव देशमुख. दूध.संघाची उभारणी संग्रामसिंह देशमुख यांनी सुरुवात केली.केवळ दुध जमा करणे व पाठवणे एवढेच काम काही दिवस केले आता मात्र दुध संघ डोंगराई नावाच्या ब्रँडच्या नावाने दूध, श्रीखंड, लस्सी,पनीर व इतर सर्व प्रकारच्या उपपदार्थ निर्मिती करून पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे.यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान मोठे आहे.भविष्यात हा दुध संघ मोठ्या शहरातही आपली उत्पादने पाठविण्यात येणार आहेत. नवनवीन मशिनरी बसविण्यात येणार आहे. यामुळे तयार होणारा माल दर्जेदार व अनेक दिवस टाकावू होणार आहे.असे शेवटी अपर्णाताई देशमुख म्हणाल्या
दूध संघाचे चेअरमन तानाजी जाधव म्हणाले की आज संपतराव दूध संघाची स्थापना होवून वीस वषै झाली. संघाच्या भरभराटित आपणा सर्वाचे योगदान मोठे आहे.आता संघाचे विस्तारीकरण होत आहे.यामुळे भविष्यात दजैदार उत्पादन तयार होणार आहेत. यामुळे दुग्ध उत्पादन करणारे,संघाचे कर्मचारी, इतर घटक यांचे भवितव्य चांगले घडणार आहे.संघाचे कर्मचारी कामसू आहेत. भविष्यात आपण आदर्श काम करून संघाच्या भरभराटित योगदान दयावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास यावेळी, दुध संघाचे व्हा. चेअरमन श्री. राजकुमार निकम, संचालक श्री. शेखर मोरे, चंद्रकांत पाटील, संदेश दंडवते, तसेच संघाचे कार्यकारी संचालक व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ःसंपतराव देशमुख दूध संघाच्या स्थापना दिन निमित्ताने बोलताना सौ.अपर्णाताई देशमुख, व्यासपीठावर चेअरमन तानाजी जाधव,व्हा.चेअरमन राजकुमार निकम,संचालक व मान्यवर।