कडेगाव पोलिस स्टेशन येथे उभारली राष्ट्रीय एकात्मतेची गुढी

0
1280
Google search engine
Google search engine

कडेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेची गुढी हा कार्यक्रम आज सकाळी ०९:३० वाजता पोलीस स्टेशन प्रांगणात ठेवला आहे. सर्व धर्म समभाव या उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला.खरे तर पोलिस स्टेशनने इतिहासात गुढी पाडव्याच्या निमित्ताने गुढी उभा करण्याचा नाविण्यपुर्ण उपक्रम वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन हसबनिस व पोलिस कर्मचारी ,महीला पोलिस,पोलिस पाटील त्याचबरोबर जेष्ठ नागरिक,पत्रकार यांच्या उपस्थित घेऊन व महीलांच्या शुभहस्ते गुढी उभा करून कडेगांव पोलिस स्टेशनचे नाव महाराष्ट्रात पोलिस खात्यात सुवर्ण अक्षरांनी कोरले असेच म्हणावे लागेल.सदर कार्यक्रमास कडेगांव चे जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख माजी सैनिक शिवाजीराव देशमुख, जेष्ठ पत्रकार साहेबपीर पिरजादे,उपनगराध्यक्ष साजिद पाटील शिराज पटेल,माणिकराव देशमुख, विजय गायकवाड मानसिंगराव देशमुख,नासिर पटेल रियाज इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख,जेष्ठ पत्रकार साहेबपीर पिरजादे माजी सैनिक शिवाजीराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून गुढी पाडव्याच्या पोलिसांनी शुभेच्छा दिल्या.अशा सोनेरी दिवसाच्या सोनेरी क्षणाला पोलिसांचे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पुढाकार घेऊन सामाजिक एकोपा टिकवण्याच्या उपक्रमाचे कौतुक कडेगांव तालुक्यातील नागरीकातुन होत आहे.यावेळी महीला पोलिस काॅस्टेबल,पोलिस पाटील,जेष्ठनागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.