श्री संत गुलाबबाबा व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सव आजपासुन

0
648
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतीनिधी
श्री महादेव मंदिर संस्थान देवदार पुरा,सोमवार वेस,आकाेट येथे फार पुरातन काळा पासुन शिवलिंग अाहे व ते मंदिर एक जागृत देवस्थान असून सर्व शिवभक्तया पुरातन मंदिरांमध्ये नेहमी पूजा अर्चना करीत असतात.
काही वर्षा अगोदरच या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलेेले आहे.मंदिर फार पुरातन असल्यामुळे या ठिकाणी शिवलिंगाची निरंतर अभिषेकामुळे त्या शिवलिंगाची झीज झालेली दिसत असल्यामुळेत्या ठिकाणी नवीन शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्याचे मंदिराच्या वतीने ठरवण्यात आले आहे.सोबतच श्री संत गुलाबबाबा यांची सुंदर ,सुरेख मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.या महोत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 6 एप्रिल ते 14 एप्रिलच्या दरम्यान करण्यात येत आहेत.
6 एप्रिल भव्य मिरवणुकीचे आयोजन ,
7 एप्रिल हभप श्री गावंडे महाराज यांचे भारूड
वेळ सायंकाळी सात ते दहा
8 एप्रिल भक्ती संगीत हभप दुर्गेश बाडे
9 एप्रिल हभप श्री पवन पाल महाराज यांचे कीर्तन
10 एप्रिल शाहीर विजय पांडे यांचे सप्त खंजेरीवादक यांचे कीर्तन प्रबोधन
11 एप्रिल सावळे गुरुजी यांचे कीर्तन
12 एप्रिल महादेवाचे लग्न
13 एप्रिल गीत रामायण सादर करते श्री सुधीरजी महाजन
14 एप्रिल हभप लोणाग्रे महाराज यांचे काल्याचे कीर्तन.
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार व सचिव राजीव झाडे व समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.