चांदूर रेल्वेत माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांची द्वितीय पुण्यतिथी – मान्यवर व कार्यकर्त्यांनी वाहिली डॉ. ढोलेंना श्रद्धांजली

0
647
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)
शेतकरी- शेतमजुरांचे कैवारी, ओ.बी.सी. स्कॉलरशिपचे शिल्पकार, रेल्वे थांब्याचे जनक, तथा चांदूर रेल्वेचे माजी आमदार, लोकनेते स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या व्दितीय पुण्यतिथी निमित्य शनिवारी स्थानिक ढोले कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.
   स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्य आयोजीत करण्यात आलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. विनोद जोशी हे होते. त्या प्रसंगी डॉ. क्रांतीसागर ढोले, आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी, माजी नगरसेवक मेहमूद हुसेन, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, धर्मराज वरघट, रमेश कुबडे, श्री. भगत, अंबादास हरणे, अशोक हांडे, संजय डगवार, कॉ. विनोद जोशी यांनी आपल्या भाषणातून स्व.डॉ. पांडुरंग ढोले यांच्या जाण्यामुळे चांदूर रेल्वे मतदार संघात एक पोकळी निर्माण झाली आहे. स्व. ढोले साहेब हे आमदार असतांना त्यांनी चांदूर रेल्वेला विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळवून दिला. व त्यानंतर जबलपूर व इंटरसिटी रेल्वे थांब्यासाठी आंदोलन उभे केले आणि तेही आंदोलन त्यांचे यशस्वी झाले. स्व.डॉ. पांडुरंग ढोले हे शेवटच्या क्षणापर्यंत शेतकरी शेतमजुर-गोर गरिबांसाठी मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून लढत राहिले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या डॉ. ढोले साहेबांचे विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष पुढे चालू ठेवू असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले. सदर त्याप्रसंगी कार्यक्रमात सुधीर सव्वालाखे, दादाराव डोंगरे, साहेबराव शेळके, प्रमोद बिजवे, गौतम जवंजाळ, चंदू सिरसाट, अवधूत सोनवणे, विठ्ठलराव गुल्हाने, राजू हेरोडे, भिमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, रमेश गुल्हाने, गजानन शहाडे, सुनील हुमने, ज्ञानेश्वर भोगे, घोडे, रामदास  कारमोरे, डॉ. पडोळे, शंकरराव आंबटकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संजय डगवार यांनी केले.