लाखोंनी घेतले श्री संत अवधुत महाराजांच्या समाधीचे दर्शन – ७२  फुट उंच झेंड्यांना चढवली नवीन खोळ, लाखो रूपयाची कापूर ज्योत

0
1678
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

तिनशे वर्षापूर्वी अवधुत पंथाची स्थापना करून समतेची शिकवण देणारं श्री संत कृष्णाजी अवधुत
महाराजांच्या बोहलीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर आज श्रीक्षेत्र सावंगा विठोब्यात उसळला.
लाखोंचा कापुर जाळून भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भर दुपारी समानतेचे प्रतिक देव व
भक्ताच्या ७२ फुट उंच झेड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोळ चढविण्याचा भव्य-दिव्य, चित्तथरारक
धार्मिक विधी उत्साहात पार पडला.


महाराष्ट्रासह देशातील लाखोंचे श्रध्दास्थान श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या गुढीपाडवा यात्रेला ५
एप्रिल पासून सुरूवात झाली. गुढीपाडव्याला पहाटेपासूनच वाहणाच्या रांगा सावंगा विठोबा मार्गावर
लागल्या होत्या. भाविक मिळेल त्या वाहनाने सावंग्यात दाखल झाले. दूरचे असंख्य भाविक कुटूंबासह
आधीच सावंग्यात डेरे दाखल झाले. पहाटेपासून भाविक अवधुत महाराजाच्या बोहलीच्या दर्शनासाठी
धडपडत होते. त्यामूळे मंदिरासमोर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भर उन्ह्यात आबालवृध्द
मिळेल त्या ठिकाणी हातातील विटेवर कापूर जाळत होते. त्यामूळे परिसर कापुराचा सुगंध दरवळत होता.
भाविकांना बोहलीचे दर्शन घेता यावे यासाठी संस्थानचे पदाधिकारी स्वंयसेवक व ग्रामस्थ सतत झटत
होते. यात्रेत विविध वस्तुंची दुकाने व उंच आकाश पाळणे लक्ष वेधून घेत होते. देवस्थानच्या विकास
दानातून करण्यात आला असून आमदार व खासदार यांनी कोणताही निधी दिलेला नाही. भक्तांनी
सढळ हाताने दान देउâन रितसर पावती घ्यावी असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष गोविंद राठोड यांनी
यावेळी केले.

७२ फुट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढवली


गुढीपाडव्याला दुपारी ४ वाजता ७२ पुâट उंच देव व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याच्या
कार्यक्रमाला सुरूवात झाली. हभप चरणदास कांडलकर यांनी आंघोळ करून नवीन शुभ्र वस्त्र परिधान
केले. संस्थानचे पदाधिकारी गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, विनायक पाटील,
पुâलसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, कृपासागर राऊत, अनिल बेलसरे, दिगांबर राठोड, पुंजाराम नेमाडे,
स्वप्निल चौधरी यासह चरणदास कांडलकर यांनी श्री अवधुत महाराजाच्या बोहली व गादीचे दर्शन
घेतले. झेंड्यांचे विधीवत पुजनानंतर हभप कांडलकर यांनी झेंड्यांना पद स्पर्श न करता दोरखंड्याच्या
गाठा मारत जुनी खोळ काढत ते झेंड्याचा सर्वाेच्य टोकावर पोहचले. यावेळी पारंपारिक झांज व मृदंगाच्या
साथीने अखंड अवधुती भजनाची मांड सुरू होती. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत हभप कांडलकर
खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा दोन तास चालला.

पोलीसांचा चोख बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप झलके यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ शिंगटे यांनी ६ पोलीस
अधिकारी,११७ शिपाई, दंगा नियंत्रण पथक व बॉब शोधक स्कॉड च्या साह्याने यात्रेची चोख सुरक्षा
ठेवली. पोलीस व मंदिराचे स्वंयसेवकांनी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावल्या. पोलीसांनी वाहतूक व
पार्कींग व्यवस्था कडक ठेवली. तर मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा व्दारे परिसरावर नजर ठेवली..
चांदूर रेल्वे व अमरावती एसटी आगाराने सावंगा विठोबा यात्रेसाठी विशेष बसफेऱ्यांची व्यवस्था केली.