काश्मीरमध्ये प्रचाराच्या वेळी भाजप भगव्याऐवजी हिरव्या रंगात !

0
583
Google search engine
Google search engine

 

श्रीनगर – काश्मीरमध्ये भाजप त्याच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भगव्याऐवजी हिरव्या रंगाचा वापर करतांना दिसत आला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शेख खालिद जहांगिर यांनी त्यांच्या प्रचारार्थ स्थानिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिरव्या रंगात त्यांची विज्ञापने प्रकाशित केली आहेत. काश्मीरमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या ‘ग्रेटर काश्मीर’ आणि ‘काश्मीर उजमा’ या वर्तमानपत्रांत शेख खालिद यांच्या प्रचारार्थ विज्ञापने दिली आहेत.

१. जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या विज्ञापनांचे समर्थन करतांना म्हटले की, भाजपच्या झेंड्यात हिरवा आणि भगवा हे दोन्ही रंग वापरण्यात आले आहेत. हिरवा रंग शांती आणि प्रगती यांचे प्रतीक आहे. भाजप रंगांवर विश्‍वास ठेवत नसून ‘सबका साथ सबका विकास’ हेच आमचे ध्येय आहे.केवळ भाजपच्याच झेंड्यात सर्वधर्मीय रंगांचा समावेश केला आहे. याउलट पीडीपीचा झेंडा हा हिरवा आहे, तर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा लाल आहे.

२. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपच्या या विज्ञापनांवर टीका करतांना म्हटले की, काश्मीरमध्ये पोचताच भगव्या रंगाचा भाजप हिरव्या रंगात पालटला. भाजपकडून मतदारांना मूर्ख बनवण्यात येत आहे. काश्मीरमध्ये प्रचारासाठी भाजप त्याच्या खर्‍या रंगाचा वापर का करत नाही?

३. ओमर अब्दुल्ला यांच्या प्रश्‍नावर उत्तर देतांना शेख खालिद म्हणाले की, रंग सोडून द्या, माणूस पहा. मी तुमचाच आहे.