भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे देशाची विनाशाकडे वाटचाल― प्रा टी.पी मुंडे

0
778
Google search engine
Google search engine

बजरंग सोनवणे यांना विजयी करणे ही काळाची गरज

बीड:परळी

अच्छे दिन च्या नावाखाली पाच वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाने देशाचे अक्षरशः वाटोळे केले याच निर्लज्ज चोरांच्या टोळक्याने वचन नाम्या नंतर संकल्प पत्र काढून शब्दांचा खेळ करीत जनतेला वेड्यात काढले भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे देशाची पुन्हा विनाशाकडे वाटचाल होणार असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी व्यक्त केली

बीड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौऱ्यात प्रा टी पी मुंडे सर व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या नेत्यांनी आज पिंपळा धायगुडा गिरवली पूस जवळगाव धानोरा दैठणा मुडेेगाव वाघाळा राडी पोखरी सेलू आंबा सायगाव आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी प्रत्यक्ष थेट संवाद साधला

यावेळी बोलताना प्रा टी पी मुंडे सर यांनी भाजप व जातीवादी पक्षाच्या अपयशाचा पाढा वाचून भाजपने आज जाहीर केलेल्या संकल्प पत्रावर मोठा प्रहार केला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून 2014 ला सत्ता मिळविणारे चोराच्या टोळीचे मुख्य सूत्रधार मोदी शहा फडणवीस किती दिवस जनतेला फसवणार आहेत आजच भाजपाने जाहीर केलेल्या संकल्प पत्रात एकही मुद्दा नवीन नाही हे सर्व मुद्दे 2014 च्या निवडणुकीत होते त्यातील एकही वचनपूर्ती झाली नाही मग तुमचे संकल्पपत्र शेतकरी शेतमजूर दीन दलित बहुजन अल्पसंख्यांक व्यापारी नागरिक यांच्या काय हिताचे असा सवाल प्रा टी पी मुंडे सर यांनी उपस्थित करून मोदी शहा फडणवीस चोराच्या सूत्रधाराचें खोटारडे पण ओळखा असे आवाहन केले

बीड जिल्ह्याच्या विषयावर बोलताना प्रा टी पी मुंडे सर यांनी खासदार व पालकमंत्री या मुंडे भगिनींनो आतातरी भावनिक राजकारण सोडा केंद्र व राज्यातील सत्ता हाती असतानाही बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही याला कारणीभूत कोण याचे उत्तर जनतेला द्या अन्यथा खोटारडेपणा शेतकरी शेतमजूर दीनदलित अल्पसंख्यांक बहुजन व्यापारी सामान्य नागरिक यांची फसवणूक केल्यामुळे मुंडे भगिनींचा खोटारडेपणा उघडा पडल्यामुळे गावागावात व वार्डा वार्डात मतदार अडवतील असा इशारा प्रा टी पी मुंडे सर यांनी दिला

यावेळी प्रचार दौर्‍यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील किसनराव बावणे गोविंदराव देशमुख शिवाजीराव देशमुख आपेट गुरुजी जयवंतराव देशमुख अशोकराव नाना गंगणे जि प सदस्य शिवाजी सिरसाट पंचायत समिती चे सदस्य प्रा प्रशांत जगताप मिराताई जगताप ईश्वर शिंदे डॉ माणिक कांबळे संजय पांडे दत्तात्रय ढवळे कल्याणराव भगत सुरेश ताटे अशोक मस्के रणजीत हारे नितीन हारे बळवंत बावणे हनुमंत गायकवाड गंगाधर आपेट गणेश गंगणे अमोल आडे, अनिल औताडे,सचिन गित्ते जयसिंग व्हावळे , आदी सह महाआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते