खासदारांचा वचननामा म्हणजे शिळ्या कढीला ऊत !

0
756

जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे उत्तर मुंडे भगिनींनी द्यावे―सूर्यकांत मुंडे व प्रा विजय मुंडे यांचा सवाल

परळी/प्रतिनिधी

वारसाहक्क चालविण्याच्या नावाखाली राजकारणाचे नाटक करणाऱ्या पालकमंत्री व खासदार या मुंडे भगिनींनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे उत्तर द्यावे असा परखड सवाल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे व युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा विजय मुंडे यांनी उपस्थित करून भाजपाच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल संतापजनक आश्चर्य व्यक्त केले

बीड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी विधानसभा मतदारसंघात व परळी शहरात प्रचारफेऱ्या काढून सूर्यकांत मुंडे व प्रा विजय मुंडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी- शहा या हुकूमशहांनी सामान्य जनतेवर अन्याय केल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले

बीड जिल्ह्याच्या खासदारांनी प्रसिद्ध केलेला वचननामा म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे मागील निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यातील खासदार ताईंचे सर्वच्या सर्व 33 मुद्दे याही वचननाम्यात आहेत असा गौप्यस्फोट करून मुंडे भगिनी किती दिवस खोटे बोलणार आहेत व सामान्य जनतेची शेतकरी शेतमजुरांची ऊस उत्पादकांची व्यापाऱ्यांची दीनदलित अल्पसंख्यांकांची फसवणूक किती दिवस करणार आहेत याचे उत्तर मुंडे भगिनींनी द्यावे असा खोचक सवालही सूर्यकांत मुंडे व प्रा विजय मुंडे यांनी केला

दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महा आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून परळी विधानसभा मतदारसंघातून बजरंग बप्पा सोनवणे यांनाच मताधिक्य मिळणार असल्याचा दावाही सूर्यकांत मुंडे व प्रा विजय मुंडे यांनी केला