चांदूर रेल्वेत लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी पुर्ण – आज ३७५ मतदान केंद्राचे होणार साहित्य वाटप

0
754
१५०० कर्मचारी, ३८ राखीव पथक, ३३ झोनल अधिकारी
२ सखी मतदान केंद्र
४०० पोलीस अधिकारी – कर्मचारी, २०० होमगार्डचा ताफा राहणार तैनात
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या ११ एप्रिल २०१९ रोजी होत असून त्यादृष्टीने चांदूर रेल्वेच्या प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज बुधवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुक साहित्य वाटप होणार असुन आज सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचणार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या धामणगाव मतदार संघामध्ये चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्याचा समावेश आहे. तीनही तालुके मिळून ३७५ मतदान केंद्र राहणार असुन यामधील चांदूर रेल्वेतील २ मतदान केंद्र ‘सखी मतदान केंद्र’ राहणार आहे. या सर्व केंद्रांवर प्रत्येकी १ प्रमाणे एकुण ३७५ केंद्राध्यक्ष व प्रत्येकी ३ प्रमाणे ११२५ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे ३८ मतदान पथक राखीव ठेवण्यात आले आहे. तर ३३ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज बुधवारी सकाळी १० वाजतापासुन ३७५ मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांदूर रेल्वेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुक साहित्य वाटप होणार असुन सर्व कर्मचारी सायंकाळी ४ ते ५ वाजतापर्यंत मतदान केंद्रावर पोहचणार असुन याची खात्री झोनल अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. सर्व कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रावर पोहचले की नाही याबाबतची माहिती झोनल अधिकारी सहाय्यक निवडणुक अधिकाऱ्यांना देईल. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर साहित्यासह पोहचविण्यासाठी ३८ एस. टी. बसेस व १६ चारचाकी गाड्यांची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागामार्फत सुध्दा तगडा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रांवर राहणार असुन यामध्ये २० पोलीस अधिकारी, बाहेरील जिल्ह्यातुन आलेले १५० पोलीस कर्मचारी, ८ पोलीस स्टेशनचे जवळपास २४० पोलीस कर्मचारी व २०० होमगार्ड्स तैनात करण्यात येणार आहे. मतदान उद्या गुरूवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत होणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार भगवान कांबळे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार महादेव जोरवार यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व एसडीओ, तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी कार्यरत आहे.
एकुण ३ लाख ११ हजार मतदार
चांदूर रेल्वे – धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघांतर्गत एकुण ३ लाख ११ हजार ६१४ मतदार आहे. यामध्ये चांदूर रेल्वेत पुरूष मतदार ४४२६०, महिला मतदार ४३१४७, इतर १, धामणगाव रेल्वेमध्ये पुरूष मतदार ५६१८३, महिला मतदार ५४१२४, इतर २, नांदगाव खंडेश्वर मध्ये पुरूष मतदार ५८१३७, महिला मतदार ५५७५९, इतर १ अशी आकडेवारी आहे.
मतदानाची तयारी पुर्ण – एसडीओ अभिजीत नाईक 
चांदूर रेल्वे – धामणगाव विधानसभा मतदार संघातील मतदानाची सर्व तयारी पुर्ण झालेली आहे. आज बुधवारी कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप होणार असुन सर्व कर्मचारी आज मतदान केंद्रावर पोहचणार आहे. उद्या गुरूवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान मतदान होणार असुन सर्व मतदारांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन वर्धा लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांनी केले.
४०० पोलीस राहणार तैनात – एसडीपीओ शिंगटे
११ एप्रीलला होणाऱ्या निवडणुकीसाठी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मतदान केंद्रावर २० पोलीस अधिकारी, बाहेरील १५० पोलीस कर्मचारी, तीनही तालुक्यात येणाऱ्या ८ पोलीस स्टेशनचे जवळपास २४० पोलीस कर्मचारी व २०० होमगार्ड्स तैनात राहणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी दिली.