जनता दल (सेक्युलर)चा वंचीत बहुजन आघाडीला जाहिर पाठींबा – वर्धा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड.धनराज वंजारी यांना दिले पत्र

0
929
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान 

वर्धा लोकसभा निवडणूकीत जनता दल सेक्युलरचा उमेदवार निवडणूक रिंगणात
नसल्याने डॉ.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास ठेवून जनता दल
सेक्युलरने वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी यांना जाहिर पाठींबा
दिला आहे.


आज चांदूर रेल्वेत येथील ढोले कॉम्प्लेक्स स्थित पक्ष कार्यालयात जनता दल
(सेक्युलर)ची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी पुâले शाहु आंबेडकर यांच्या विचार
सरणीचे चांदूर रेल्वेचे माजी आमदार तथा जनता दल (से) चे माजी प्रदेशाध्यक्ष, लोकनेते
स्व.डॉ.पांडुरंग ढोले यांना विनम्र अभिवादन करून बैठकीला सुरूवात झाली. वर्धा लोकसभा
निवडणूकीत जनता दल सेक्युलर चा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने अ‍ॅड.प्रकाश
आंबेडकर यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास ठेवून सर्वानुमते वंचीत बहुजन आघाडीचे वर्धा
लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड.धनराज वंजारी यांना लोकसभा निवडणूकीकरीता
धामणगाव-चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहिर पाठींबा दिला आहे. तसे लेखी पत्र
जद(सेक्यु)चे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे व तालुकाध्यक्ष धर्मराज वरघट यांनी
भारिप-बमसंचे ंजिल्हाध्यक्ष प्रा.चरणदास निकासे व तालुकाध्यक्ष मुवूâल परगणे यांच्या नावे
दिले. ते पत्र भारिप-बमसं चे तालुकाध्यक्ष मुकुपरगणे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष
पे्रमचंद अंबादे यांना देण्यात आले. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे जगदिश गंधे, सिध्दार्थ
चिकटे, चरणदास भारसाकडे, अर्जुन जिभकाटे उपस्थित होते. तर जनता दल सेक्युलरचे
अ‍ॅड.सुनिताताई भगत, छायाताई झाडे, चांदूर रेल्वे न.प.चे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी, मेहमूद
हुसेन, सुधीर सव्वालाखे, शंकरराव आंबटकर, डॉ.पडोळे, चंद्रशेखर सिरसाट, साहेबराव
शेळके, राजेंद्र हेरोडे, रमेश कुबडे, भीमराव खलाटे, संजय डगवार, महादेव शेंद्रे, रमेश गुल्हाणे,
अशोक हांडे, प्रमोद बिजवे, चंदू घोडेस्वार, मनोहर महाजन, अवधुत सोनोने, ज्ञानेश्वर सोनोने,
सुनिल हुमणे, रामराव गाडवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.