लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना व मित्रपक्ष एकसंघपणे लढत देणार: माजी आमदार पृथ्वीराज देशमुख

Google search engine
Google search engine

 

लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपा शिवसेना व मित्रपक्ष एकसंघपणे लढत देत आहे परंतू विरोधकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. बुथनिहाय कार्यकर्त्यानी घरोघरी जावून आपली भूमिका पटवून द्यावी. असे प्रतिपादन सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. .

कडेगांव येथे भाजपा व महायुतीचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांचे प्रचारार्थ आयोजीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार संजयकाका पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राजाराम गरुड, जि. प. सदस्या रेश्मा साळुंखे, शांता कनुंजे, सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, प्रा. आशिष घार्गे, मंगल क्षिरसागर, तालुका अध्यक्ष धनंजय देशमुख, नगरपंचायतीचे विरोधीपक्षनेते उदय देशमुख, संतोष डांगे, वसंतराव गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री देशमुख बोलताना पुढे म्हणाले की, युतीशासनामुळे टेंभू योजनेचा शुभारंभ झाला त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गीलागला आहे. कडेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. कडेगांव नगरपंचायतीला मोठ्याप्रमाणात निधी राज्य सरकारने दिला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाचे संजयकाका पाटील विजयी होणे गरजेचे आहे. भाजपाच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी..

खा. संजयकाका पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणाच्या योजना ग्रामीण भागातील लोकांचे पर्यंत पोहोचविण्यास सांगली जिल्हातील पक्षाचे आमदार जि. प. पदाधिकारी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीमध्ये निश्चीत यश मिळेल. जिल्ह्यातील विरोधक भाजपाला विरोध करुन विकासाला विरोध करताहेत. गेली चाळीस वर्षे सत्ता होती तुमचेकडे होती त्यावेळी आपण विकासासाठी काय केले व भाजपाने पाचवर्षात किती विकास कामे केली याचा लेखाजोखा जनतेकडे आहे. त्यामुळे जनता आपल्या बरोबर आहे. जनतेच्या भावना मतांमध्ये रुपांतरीत करणेचे काम कार्यकत्यांनी करावे..

यावेळी स्वागत ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. जेष्ठनेते चंद्रसेन देशमुख यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी हणमंतराव गायकवाड, सुभाष मोहिते, सुरेश यादव, किशोर मिसाळ, मारूती माळी, नितीन शिंदे, आश्विनी वेल्हाळ, इम्तियाज शेख, सादीक इनामदार, यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संतोष डांगे यांनी मानले.