लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 : निवडणूक कालावधीत धुमस चित्रपटाच्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित करण्यास बंदी – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी – चित्रपटाच्या मुद्रित माध्यमातील जाहिरातींचे पूर्वप्रमाणन बंधनकारक

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी आचारसंहिता सुरू आहे. 44- सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी श्री. गोपिचंद पडळकर हे वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवार आहेत. गोपिचंद पडळकर यांची भूमिका असलेला ”¬Öã´ÖÃÖ” हा चित्रपट सांगली जिल्ह्यासह राज्यभर प्रदर्शित झाला आहे. सदरचा चित्रपट हा मतदारांवर प्रभाव टाकणारा असल्याचे माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे मत झाल्याने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या चित्रपटासंदर्भातील कोणतेही पोस्टर अथवा प्रचारसाहित्य अथवा ट्रेलर अथवा जाहिरात इ. तत्सम बाबी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत प्रसारित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हणाले, तसेच, धुमस या चित्रपटासंदर्भात मुद्रित माध्यमात प्रसारित करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती/पोस्टर/प्रचारसाहित्य इ. तत्सम बाबींचे माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे बंधनकारक असून, त्यामुळे अशा पूर्वप्रमाणन नसलेल्या जाहिराती मुद्रित माध्यमांमधून आचारसंहिता कालावधीत कोठेही प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बायोपिक इत्यादिद्वारे राजकीय मजकूर प्रसारित करण्यासंदर्भात दि. 10 एप्रिल 2019 रोजी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सदरची कारवाई करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
तसेच, गोपिचंद पडळकर यांच्याशी संबंधित माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून न घेतलेल्या प्रचारसदृश्य जाहिराती युट्युबवर अपलोड केल्याचे निदर्शनास आल्याचे 48 तासात खुलासा करण्याबाबतही त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
00000