पत्रकार परिषदेत सुटला वामनराव चटप यांचा तोल

0
682
Google search engine
Google search engine

शेगांव:- काल दिनांक 14 एप्रिल रोजी वेगळा विदर्भाचे समर्थक वामनराव चटप यांनी शेगावी पत्रकार परिषद घेतली आणि वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन फसवणूक करणारी भाजपा आणि सतत विरोध करणारी शिवसेना यांना या लोकसभा निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवा .
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही असाच धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली सदविवेक बुद्धी वापरून जनतेने मतदान करावे ,असे आवाहन त्यांनी केले मागील १५ वर्षे कांग्रेस आणी राष्ट्रवादी यांची सत्ता होती त्यावेळी शेतकरी , मजुर , आदिवासी व व्यापारी,तसेच बेरोजगार याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करुन त्यांना मुख्य धारेतुन वंचित ठेवल, त्यावर विकासाचा बागुलबुवा उभा करून भाजपसेना सरकारनेसुद्धा यांना नेहमी असेच लटकवत ठेवले या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, डॉ.निलेश पाटील, महिला आघाडी प्रमुख रंजनाताई मामडे तसेच विलास राठोड, कमल सुरेखा, वंचित आघाडी शेगावचे दिपक शेगोकार, मिलिंद शेगोकार, रवी शेगोकार उपस्थित होते. वामनराव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना नेता रविकांत तुपकर यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी हसून उत्तर दिले कि त्यांना ‘नेहमी वेगवेगळी लग्न लावून घेण्याची सवय आहे, मागच्या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची युती होती त्यांच्यासोबत संसारात ठिनगी उडली म्हणुन आता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत लग्न केलं त्यामुळे शेतकऱ्यांबाबत त्यांच्या मनात किती कृतज्ञता आहे हे समजते’ पण महत्त्वाचा प्रश्न इथं तो दिसून आला की वामनराव चटप हे शेवटी कोणत्या पक्षासाठी लॉबिंग करत आहेत कारण या पत्रकार परिषदेमध्ये वंचित आघाडीचे शेगाव चे नेते उपस्थित होते. बोलत असतांना ‘मला पसंत असेल ती घेवुन मी पळुन जाईल’ असाही त्यांचा तोल सुटला तर कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस , सेना – भाजपा हे चोर चोर मावस भावु आहेत यांनी मिळुन बुलढाणा बँकेच वाटोळ केल असे ही ते बोलले त्यामुळे वामनराव चटप नेमके कोणाचे याचा संभ्रम पडतो.