कुलरचा करंट लागुन ३५ वर्षीय विवाहीतेचा मृत्यु धनोडी येथील घटना

892
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.) 
कुलरचा करंट लागुन ३५ वर्षीय विवाहीतेचा मृत्यु झाल्याची दु:खद घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथे बुधवारी (ता. १७) दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वेवरून ८ कि.मी. अंतरावरील धनोडी येथील प्रिती दत्ता उर्फ दिपक  नखाते (३५) यांच्या घरची लाईट गेली असतांना कुलरचा बटन सुरू होता. लाईट गेली असतांना त्यांचा हात कुलरला लागुन होता व तेवढ्यातच अचानक लाईट येऊन विद्युत प्रवाह सुरू झाल्याने कुलर सुरू झाला. व कुलरमध्ये अचानक करंट आल्याने आधीच कुलरला स्पर्श करून असलेल्या प्रिती नखाते यांना करंट लागला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्यावर चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून रात्री ९ वाजता धनोडीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक प्रिती नखाते यांच्या परिवारात सासरे, पती, ८ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगी आहे. प्रिती ह्या पतीसह मजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या अचानक मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असुन संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।