वीज वितरण कार्यालयाजवळ पाणपोईचे उदघाटन

0
638
Google search engine
Google search engine

अकोट ता.प्रतिनिधी
उन्हाचा पारा चाळीसीच्या घरात जावून पोहोचलाय उन्हाने जीवाची काहीली होत आहे ,प्रत्येकाला वेळोवेळी पाण्याची गरज भासत आहे . अशातच खेड्या पाड्यातील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी अकोटला तालुक्याच्या ठिकाणी यावेच लागते . विज वितरण ऑफिस कडे सुध्दा लोकांची वर्दळ असते अशा वेळेस लोकांची तृष्णा भागावी व त्यांना उन्हापासून दिलासा मिळावा या सामाजिक उद्देशाने गेल्या आठ वर्षांपासून महा पारेषण ऑफिस जवळ दर्यापूर रोड अकोट येथे वीज महा पारेषण कंपनी चे निवृत्त कर्मचारी व सेवाभावी व्यक्तिमत्व दिनकर राव पाटकर हे स्वखर्चातून येथे पाणपोई लावतात , बरेच वर्षपासून त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे आज त्यांच्या पाणपोई चे उदघाटन महाराष्ट्र राज्य महापारेशन कंपनी १३२ kv सब स्टेशन चे उप कार्यकारी अभियंता श्री मनोज कुमार तायडे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रहारचे तुषार पुंडकर , महावितरण कर्मचारी अजय गजबे,धनराज जी हिवरे, महापारेषण चे संतोशजी गिरी ,अमोल चिंचोलकर, धनराज डहाके, तुषार लंभाडे, सुशांत गायकी व बरेच नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते . पाटकर साहेब दरवर्षी वृक्षारोपण सुद्धा स्वखर्चातून करतात