*अमरावती – ब्रेकींग:- प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण*

0
1584
Google search engine
Google search engine

*अमरावती -*

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत अकोला येथील रहिवाशी भाई रजनीकांत या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांचा हा मॅसेज व्हायरल झाला. भाई रजनीकांत हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे काही कामानिमित्त आले होते. तेव्हा नगरसेवक अॅड. संतोष कोल्हे यांनी त्यांना बस स्टँडसमोरील एका हाॅटेलमध्ये बोलावले. तिथे त्यांना जाब विचारला असता वाद झाला त्यामुळे 2 ते 3 जणांनी मिळून त्यांना जोड्यानं मारहाण केली