चांदुर बाजार तालुक्यात अवकाळी पावसाची धुवाधार बैटींग मुळे लाखोंचे नुकसानगहू ,कांदा,केळी संत्रा पिकाचे मोठे नुकसान,सर्वेक्षण आदेश कधी होणार सर्व्हे?

0
809
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार तालुक्यात अवकाळी पावसाची धुवाधार बैटींग मुळे लाखोंचे नुकसान
गहू ,कांदा,केळी संत्रा पिकाचे मोठे नुकसान,सर्वेक्षण आदेश कधी होणार सर्व्हे?

चांदुर बाजार

चांदूर बाजार दिनांक 17 ला रात्री च्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यात प्रामुख्याने गहू केळी संत्रा कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून याच दरम्यान रात्री नऊच्या सुमारास झालेल्या विजेच्या कडकडात मध्ये खामला येथील रहिवाशी मधु गोविंद गायने हा बेलोरा शेत शिवारात असताना त्याच्या अंगावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे .त
निवडणुकीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आता याचे सर्वेक्षण कधी होणार याची या शेतकऱ्यांना लागले आहेत तर तोंडाशी आलेला घास पावसाच्या पावसामुळे निसटला असे म्हणण्यास काही हरकत नाही .त्यामध्ये प्रामुख्याने गहू हा अंतिम टप्प्यात असून गव्हाची कापणी सुरुवात झाली होती. त्यामुळे चांदुर बाजार तालुक्यातील गव्हाच्या क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे तसेच संत्रा फळबाग मधील संत्रा चे जोरदार पाऊस यामुळे नुकसान झाले आहे.कांद्याची काढणी जेमतेम सुरू झाली होती मात्र अवकाळी पावसाचा त्याला सुद्धा फटका बसला आहे.त्यामुळे कांद्याला मोठे नुकसान झाले आहे. तर केळीचे सुद्धा या झालेला अवकाळी पावसामुळे सर्वात मोठे नुकसान झाले आहे.
तरी लवकरात लवकर सर्वेक्षण होऊन प्रशासन यांनी मदत जाहीर करावी अशी आस शेतकरी वर्गाकडून होते आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग हा नाराज असल्याचे दिसत आहे. रात्रभर पावसाने आपली हजेरी लावली असल्यामुळे पावसाळा तर लागणार नाही असे चित्र निर्माण झाले होते.
दिनांक 18 एप्रिल ला लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी यात गुंतले असताना या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वेक्षण कसे होणार हा देखील एक प्रश्न उभा आहे.झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग याच्या तोंडाशी आलेला घास हिसकल्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

बॉक्समध्ये
*अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली होते.तर आमदार कडू यांनी सुद्धा तहसीलदार यांना सर्वेक्षण करण्याचे भ्रमण ध्वनी वरून आदेश दिले आहे.मात्र अध्यपहि सर्वेक्षण सुरु झाले नाही.*