अमरावती जिल्ह्यामध्ये आदर्श आचार संहिता तातडीने शिथिल करण्यात यावी – आ.डॉ.अनिल बोंडे

0
1058
Google search engine
Google search engine

 

 

*अमरावती प्रतिनिधी –*

अमरावती जिल्ह्यामध्ये वर्धा लोकसभा निवडणूक ११ एप्रिल व अमरावती लोकसभा निवडणूक १८ एप्रिल २०१९ रोजी पार पडली आहे. सध्यापरिस्थितीत अमरावती जिल्हामध्ये भीषण दुष्काळ असल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जनावरांना पाणी उपलब्ध नाही. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचान प्रश्न भीषणतेने निर्माण झालेला आहे. त्याच प्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निविदा काढणे, कार्यारंभ आदेश देणे या गोष्टी थांबलेल्या आहेत लघु पाटबंधारे खाते, स्तानिक स्तर, जिल्हा परिषद यांचे सिमेंट बंधारे, खोलीकरण व गाव तलाव, वन तलाव आणि जलसंधारणाची कामे थांबलेली आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील प्रशासकीय कामे सुद्धा आचार संहितेमुळे ठप्प झालेली आहेत हि आचार संहिता २३ मे पर्यंत सुरु राहील तो पर्यंत कोणताही बैठक घेता येणार नाही व उपाययोजना करता येणार नाही असे तालुका स्तरावरील अधिकारी जनतेला वारंवार सांगत आहेत. साध्यास्तीतीत असलेल्या आचार संहितेमुळे ग्रामीण भागातील जीवन ठप्प झालेले आहे.

 

निवडणूक पूर्ण झालेल्या असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कामे सुरु झाल्यास व लोकांचे प्रश्न सोडविल्यास मतदानावर कोणताही परिणाम होणार नाही हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. त्यामुळे आचार साहितेचा बडगा उभारून सर्व शासकीय कर्मचार्यान मध्ये हक्काची सुटी असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे अमरावती जिह्यातील आचार सहिता तातडीने उठविण्यात यावी. सर्व विकासात्मक कामे, मुलभूत सुविधांची कामे तातडीने सुरु करण्यात यावी, निविदाव कार्यारंभ आदेश देण्यात यावे तसेच पाणी टंचाई, चारा टंचाई, शेतमाल खरेदी, शेतकऱ्यांचे अनुदान वितरण, कृषी विषय सहाय्यता युद्ध स्तरावर करण्यात यावे याबाबत आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तसेच मा. आयुक्त राज्य निवडणूक विभाग तसेच मा जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदनाद्वारे आचार साहीत शिथिल करणे बाबत विनंती केलेली आहे.