चांदूरबाजार मध्ये गौण खानिज ची चोरी ?कार्यवाही कधी?अतिरिक्त मुरूम आणि गौण खनिज ची परवण्या च्या नावावर वाहतूक

जाहिरात

 

चांदूरबाजार मध्ये गौण खानिज ची चोरी ?कार्यवाही कधी?
अतिरिक्त मुरूम आणि गौण खनिज ची परवण्या च्या नावावर वाहतूक

चांदुर बाजार

गौण खनिज ची वाहतूक करणारे हे परवानगी सांगून विनापरवानगी गौण खनिज ची वाहतूक करीत आहे. हे गौण खनिजाची वाहतूक करणारे महसूल विभाग निवडणूक मध्ये व्यस्त असल्याने याचा फायदा घेत आहे. चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदीपात्र आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उपलब्ध असल्याने या ठिकाणी गौण खनिजाची वाहतूक करणारे हे अवैध पद्धतीने गौण खनिजाची वाहतूक करताना दिसत आहेत. तर अनेक कर्मचारी हे निवडणूक विभागात दंग असल्याने याचा फायदा गौण खनिज वाहतूक करणारे करीत असल्याचे दिसत आहे. मुरूम वाहतुकीचा परवाना घेताना संबंधित वाहतूक करणाऱ्या 50 ते 60 वाहतुकीचा परवाना दिला जातो. त्या मुदतीत सात ते आठ दिवसाचे असते मात्र वाहतूक करणारे हे अतिरिक्त आणि परवाना वर नमूद नसलेल्या वाहनांतून गौण खनिज ची वाहतूक करीत आहे. तर यावर कोनाचा ही अंकुश लागत नसल्याचे हे त्यांच्या लक्षात आल्याने ते मोठा प्रमानात अवैध वाहतूक करीत आहे.त्यामुळे महसूल विभागाला याचा फटका बसत आहे . या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या मंडळ अधिकारी तलाठी यांना सुद्धा याची माहिती नसल्याने त्यामुळे आता याच्यावर कारवाई कोण आणि कशी करणार हा देखील प्रश्‍न आहे.
मागील काही दिवसापासून चांदूरबाजार तालुक्यात मुरमाची वाहतूक जोरात सुरू आहे. तर परवाना मिळाल्यानंतर त्या प्रमाणात कोणत्या वाहनांमधून मुरूम की वाहतूक केली जावी असे नमूद केले असताना देखील गौण खनिज वाहतूक करणारे हे आपल्या अधिक जास्त लाभ मिळावा यासाठी जास्त वाहतूक करणाऱ्या या वाहनांतून खनिजाची वाहतूक करत आहे. एका टिप्पर मध्ये कमीत कमी तीन ते चार ब्रास मुरूम मावतो.म्हणून अधिक जास्त लाभ मिळावा यासाठी परवानगी मिळालेल्या ब्रास ची वाहतूक करायला 4 ते 5 दिवस लागतात.मात्र परवानगी 8 -15 दिवसाची मिळत असल्याने हे गौण खनिज वाहतूक करणारे अतिरिक्त मुरूम ची वाहतूक करीत आहे. मी याची परवानगी काढली असे सांगण्यात येते मात्र सहा दिवस त्याची वाहतूक पूर्ण केलेली असते मात्र याकडे अधिकारी सुद्धा लक्ष द्यायला वेळ नसल्याने हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यामुळे वाहतूक करणाऱ्या ची किंमत वाढली आहे .त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे हादेखील प्रश्‍न आहेत तर या वाहतुकीमुळे महसूल ला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचत आहेत.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।