उद्धव ठाकरे हाजीर हो….पुसद न्यायालयाकडून वॉरंट जारी

0
1810
Google search engine
Google search engine

 

पुसद (यवतमाळ)

 

दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं.  व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि मुद्रक प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावला आहे.

 

सामना वृत्तपत्रात २५ सप्टेंबर २०१६ रोजी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दै. सामनामधून व्यंगचित्राद्वारे ‘मुका मोर्चा’ असे संबोधून संपूर्ण मराठा समाजाची खिल्ली उडवून अपमान केल्याची तक्रार पुसदचे  दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. शिवाय सैनिकांच्या मृत्यूबाबत विडंबनात्मक व्यंगचित्र देखील प्रकाशित झाल्यानंतर भावना दुखावल्याने पुसद येथील दत्ता सूर्यवंशी यांनी न्यायालयात खाजगी फिर्यादपत्र दाखल केले होते. त्याची दखल घेऊन पुसद न्यायालयात सदर प्रकरण सुरु असून यातील आरोपी हे न्यायालयात तारखेवर जाणूनबुजून गैरहजर राहून प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, करिता आरोपी विरुद्ध वॉरंट आदेश पारित करण्याची मागणी फिर्यादीचे वकील अॅड. आशिष देशमुख यांनी केली होती. या युक्तिवादावरून न्यायालयाने उद्धव ठाकरे यांचेसह सर्व चार आरोपींविरुद्ध वॉरंट बजावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुसद न्यायालयाच्या या वॉरंट मुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे.