मा.पोलीस अधीक्षक श्री.आर.राजा यांच्या हस्ते खेळाडु आकाश आकोसर याचा सत्कार 

0
577
Google search engine
Google search engine

मा.पोलीस अधीक्षक श्री.आर.राजा यांच्या हस्ते खेळाडु आकाश आकोसर याचा सत्कार उस्मानाबाद :- दिनांक 14.03.2019 ते दिनांक 21.03.2019 दरम्यान आबुधाबी ( युएई ) येथे पार पडलेल्या 15 व्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड समर गेममध्ये भारतीय संघाने 368 पदके मिळवुन पदकांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. 192 देश या मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील मौजे कोळेवाडी ता.उस्मानाबाद येथील कु. आकाश तुकाराम आकोसकर वय 21 वर्षे याने टेबल टेनिस या क्रिडा प्रकारात पुरुष एकेरी गटामध्ये सुवर्ण पदक व पुरुष दुहेरी गटामध्ये सुवर्ण पदक अशा दोन सुवर्ण पदकांची कमाई करुन भारत देशाचे तसेच महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्हयाचे नाव लौकिक केले आहे त्याबद्दल दिनांक 22.04.2019 रोजी मा. श्री आर.राजा पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथे आकाश तुकाराम आकोसकर याचा सत्कार करुन भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी घेण्यात आलेले छायाचित्र