गायवाडी दर्यापूर रोड क्रॉसिंग वर दिली शकुंतलेने सुमोला धडक-कळाशी येथील सहा वऱ्हाडी गंभीर

0
2769
Google search engine
Google search engine

 

दर्यापूर – दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील लग्न येवदा येथे सकाळी होते त्या लग्ना करीता कळाशी येथून वेग वेगळ्या वाहनांनी वर्हाडी गेले होते लग्न लागून MH 30 P 1302 सुमो गाडी कळाशी ला जात असताना दरम्यान गणेशपूर गायवाडी शकुंतलेच्या रोड क्रॉसिंग वर ही गाडी क्रॉस करीत असताना शकुंतललेने तिला जबर धडक देऊन गाडी 50 फूट घासत नेली त्यामध्ये काही प्रवाशी सोडले असता ड्रायव्हर सह सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने कळाशी येतील ग्रामस्थांनी राजेंद्र रामकृष्ण राणे वय 55,राजू श्रीरंग राणे वय 53,गोपाल भगवान देवतळे वय 55,न्यानेश्वर विश्वनाथ बरवट वय 52,चंद्रशेखर त्रम्बकराव गावंडे सुमो गाडी चालक श्री साबळे, त्यांना उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे दाखल केले मात्र त्या सर्वांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉ आर एम भट्टड व त्यांचे सहकारी यांनी त्यांना अमरावती ला रेफर केले या रुड क्रॉसिंग वर अनेक वेळा शकुंतलेने वाहनांना धडक दिली आहे त्याठिकाणी वाचमन असणे गरजेचे आहे मात्र रेल्वे प्रशाश्ननाणे मूर्तिजापूर ते अचलपूर दरम्यान येणारे काही मोजके रुड क्रॉसिंग गेट सोडले तर बहुतांश वाचमन किंवा गेट नसल्याने हे अपघात घडत आहे वरील अपघात घडल्याचे माहीत होताच घटना स्थळी बाबाराव पाटील बरवट,गजानन पाटील देवतळे,शेतकरी संघटनेचे श्री राणे,गायवाडी चे माजी सरपंच नितीन गावंडे, भय्या पाटील बरवट, अनिल पाटील भारसाकळे,धीरज गावंडे,सतीश राऊत,राजेश पुरी,आदींनी घटना स्थळी व तसेच रुग्णालयात भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली