क्रिकेट, कबड्डी व बॅडमिंटन चे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर ८ मे पासुन – ६ मे पर्यंत क्रिडा संकुल कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन

0
582
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
तालुका क्रीडा संकुल समिती, आझाद हिंद क्रीडा मंडळ व अमरावती जिल्हा टेनिस/लेदर बॉल क्रिकेट असोसिएशन, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे भव्य उन्हाळी शिबिराचे आयोजन ८ मे ते १८ मे या कालावधीत करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये बॅडमिंटन, कबड्डी, टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुकांची नाव नोंदणी १ मे पासून ते ६ मे पर्यंत केल्या जाणार आहे. नाव नोंदणीसाठी क्रीडा संकुल येथील ऑफिसमध्ये करण्यात येईल. शिबिरातील संबंधित खेळांचे क्रीडा साहित्य स्वतः आणायचे आहे व प्रशिक्षण देण्यासाठी नंदू सोरगिवकर, संदीप शेंडे, देवेंद्र मेश्राम, नितेश गुप्ता हे योग्य ते मार्गदर्शन करतील अशी माहिती तालुका क्रीडा संकुल क्रीडा अधिकारी श्री. बडवे यांनी दिली आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.