ट्रेलरच्या धडकेत मोटारसायकल चालक ईसमाचा जागीच मृत्यू

0
735
Google search engine
Google search engine

 

कोहमारा/ प्रतिनिधी:- निलेश मेश्राम:- 

सडक/अर्जुनी तालुक्यातील सशिकरण पहाळी जवळ आज ता.२5/०४/२०१९ ला सायंकाळी-६.५० वाजता ट्रेलरच्या धडकेत मोटारसायकल चालक ईसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शशिकरण पहाळी जवळ नागपूर कडून जाणारा ट्रेलर क्र.सी.जी.०४-५७८६ च्या चालकाने हलगर्जी पणाने ट्रेलर चालवून मोटारसायकल क्र.एम.एच.३५ ए.के.६७८७ चा चालक मंगेश विष्णू बनकर वय-३२ वर्ष रा.कोदामेडी ता.सडक/अर्जुनी यांचे गाडीला धडक देवून डोक्यावरू टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि ईसमाचा जागीच मृत्यू झाला.
मंगेश हा कोदामेडीवरून नातेवाईकाचे घरी लग्न सोहळा असल्या ने पत्नी मुला सोबत बाम्हणी/खडकी येथे सोडून अहेर घेण्या करिता सडक/अर्जुनीला आला होता.बाम्हणी/खडकी ला पून्हा परत जात असतांना हा अपघात घडला.
फिर्यादी मुन्नासिंग रामसिंग ठाकूर रा.बाम्हणी/खडकी यांचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय सडक अर्जुनी येथे पाठविण्यात आले.पुढील तपास पोलिस.निरिक्षक प्रदिप अतुलकर हे करीत आहेत.