माओवाद्यांनी भाजपचे कार्यालय उडवले -भाजप सरकारने ५ वर्षांत नक्षलवादाचा समूळ नाश केला असता, तर ही घटना घडली नसती !

0
938

पलामू (झारखंड) – येथील हरिहरगंजमध्ये ‘भाकप माओवादी’ या नक्षलवादी संघटनेच्या १२ नक्षलवाद्यांनी येथील जुन्या बसस्थानकाजवळ असणारे भाजपचे कार्यालय बॉम्बस्फोट घडवून उडवून दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे कार्यालय पोलीस ठाण्यापासून ४०० मीटर अंतरावर होते. नक्षलवाद्यांनी येथे एक पत्रकही फेकले. त्यात लिहिले होते की, राफेल घोटाळा, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचे घोटाळे, तसेच अल्पसंख्यांकांवर होणारे आक्रमण यांचा विरोध म्हणून कार्यालय उडवण्यात आले.