(म्हणे) ‘धर्मयुद्धावरून साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुसलमानांची क्षमा मागावी !’

85
  • ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना संपवू’, असे विधान करणारे अकबरूद्दीन ओेवैसी यांनी हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी फातिमा यांनी कधी केली होती का ?

भोपाळ – मी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासाठी प्रचार करणार नाही. त्यांनी धर्मयुद्धाच्या संदर्भात विधान केले होते. त्यांनी मुसलमान समाजाची क्षमा मागावी, तरच त्यांचा प्रचार करू, असे भाजपच्या नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. लोकसभेची उमेदवारी घोषित केल्यावर साध्वींनी, ‘हे धर्मयुद्ध आहे’, असे विधान केले होते. त्यावर सिद्दीकी यांनी आक्षेप नोंदवला.

 

फातिमा म्हणाल्या की,

१.  साध्वी यांनी हेमंत करकरे यांच्या संदर्भातही वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी याऐवजी विकासाच्या सूत्रावर प्रचार केला पाहिजे होता.

२. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानांमुळे शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. शिवराजसिंह चौहान यांचा मुसलमानांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।