गुरुवाडी येथे विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हयाची नोंद

0
832
Google search engine
Google search engine

मौजे गुरुवाडी येथे विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हयाची नोंद

उस्मानाबाद :- फिर्यादी मंगल परमेश्वर सुर्यवंशी वय 30 वर्षे व्यवसाय मजुरी रा. आष्टा (जहागीर) ता.उमरगा ह.मु. सिध्दार्थ नगर दापोली सेमीगेट पुणे – 12 यांनी फिर्याद दिली की , माझे माहेर गुरुवाडी असल्याने दिनांक 25.04.2019 रोजी सकाळी 08.00 वा. वडीलांचे घरी आली होती. जयंती झाल्याने ती पुन्हा दिनांक 26.04.2019 रोजी पुणे येथे जाण्यासाठी बस स्टॉप गुरुवाडी येथे गेली असता सदर गावातील दादा पाटील यांचे वाहन ठरविण्यासाठी 16.30 वा.सु. गावात जात असताना आरोपी जितेंद्र महादेव कोळी रा.गुरुवाडी याने जातीवाचक शब्द प्रयोग व शिवीगाळ करुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य करुन मारहान केल्या संबंधी मंगल परमेश्वर सुर्यवंशी यांनी पोलीस स्टेशनला गुरनं. 146/19 कलम 354,323,504 भादंवि गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे जितेंद्र महादेव कोळी रा.गुरुवाडी ता. उमरगा यास अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक 26.04.2019 रोजी 19.30 वा.सु. फिर्यादी गंगाधर सिद्राम गायकवाड वय 30 वर्षे व्यवसाय क्लिनर रा. गुरुवाडी ता.उमरगा व त्याचे समाजातील लोक गुरुवाडी येथील भिमनगर येथे थांबले असताना गुरुवाडी येथील 1) जितेंद्र महादेव जमादार 2) माधवराव रामा गायकवाड असे येवुन आमचे विरुध्द कोणी पोलीसात तक्रार दिली असे म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली या घटनेच्या वेळी सतिश लहु गायकवाड, पिंटु प्रकाश पाटील दोघे रा.गुरुवाडी हे तेथे आले व त्यांनी गंगाधर सिद्राम गायकवाड याचे डोक्यात हंटरने मारुन जखमी केल्याने गंगाधर गायकवाड हे जखमी झाल्याने खाली पडले असता त्याचे समाजातील महिलांनी गंगाधर गायकवाड यांच्या भोवती कडे केले होते. त्यावेळी गावातील इतर लोकांनी दगडफेक केली आहे. या दगड फेकी मध्ये फिर्यादी गंगाधर गायकवाड यांच्या समाजाचे 1) गंगाधर सिद्राम गायकवाड (फिर्यादी) 2) अरुणा व्यंकट गायकवाड 3) आमृपाली जनार्धन गायकवाड 4) कांताबाई धनराज गायकवाड 5) मुद्रीकाबाई मारुती गायकवाड सर्व रा.गुरुवाडी ता.उमरगा हे लोक जखमी झाले. सदर घटनेची माहिती उमरगा पोलीसांना मिळाल्याने सदर गावात पोलीस आल्यानंतर यातील जखमी लोकांना पोलीस स्टेशन उमरगा येथे पाठविण्यात आले व त्यांना औषधोपचारकामी उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे पाठविले वरिल घटनेसंबंधी गंगाधर सिद्राम गायकवाड यांचे फिर्यादवरून पोलीस स्टेशन उमरगा येथे गुरनं 147/19 कलम 324,336,504,143,147,148,149 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयाचे कलम 3(1)(आर)(एस) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा हे करित आहेत. या गुन्हयामध्ये सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करुन योग्य कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

या घटनेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होवू नये , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये यासाठी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त मौजे गुरुवाडी , उमरगा शहर व इतर संवेदनशिल भागात लावण्यात आला आहे. या परिस्थितीबाबत विविध संघटनेचे लोक / प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांचेसह गावातील सर्व जातीधर्माचे लोकांना सामील करुन घेवुन शांतता बैठकीचे आयोजन देखील पोलीसांनी केले आहे.

सदर गावात सध्या योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन पोलीस तपासात नागरीकांनी व गावकऱ्यांनी सहकार्य करावे व शांतता राखावी असे आवाहन श्री आर. राजा जिल्हा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी केले आहे.