मालखेड तलावात दुर्मिळ रेड फलारोप पक्षाची नोंद

0
804
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
    चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर नेहमीच विविध पक्षांची नोंद करण्यात येते. अशातच गुरूवारी सकाळी ८ वाजता पक्षी निरीक्षणात गेलेल्या प्रतुल गोगटे यांना दुर्मिळ लाल फलारोप पक्षाचे दर्शन घडले.
      सध्या जिल्ह्यातील सर्वच तलावावर पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. युरेसियामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेले रेड फलारोप हे दुर्मिळ पक्षी वातावरणीय बदलाचा आनंद घेण्याकरिता नोव्हेंबर – डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात येतात. डिसेंबर ते एप्रिल दरम्यान युरेसियामध्ये अतिथंडी राहात असल्याने भारतातील वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरतो. त्यामुळे चार महिने येथील वातावरणात रममान होऊन ते एप्रिल-मे मध्ये वापसी प्रवासाला लागतात. हे पक्षी पाण्यातील सूक्ष्म जीवजंतू खाऊन जगतात. ते चिमणी समान दिसत असले तरी त्यांची चोच लांब असते. विशेषत: प्रजनन काळात त्यांचा डोक्यापासून पाठीचा अर्ध्या भाग लालसर दिसून येतो. म्हणून याचे नाव रेड फलारोप असे ठेवण्यात आले आहे. अमरावती येथील पक्षीमित्र प्रतुल गोेगटे हे गुरुवारी सकाळी मालखेड तलावाकडे निरीक्षणाकरिता गेले असता सकाळी ८ वाजताच्या दरम्यान तलावातील पाण्यात खाद्य शोधतांना एक पक्षी आढळून आला. त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तो लाल फलारोप प्रजातीचा असल्याचे निरीक्षण गोगटे यांनी नोंदविले. इतिहासातील तुरळक नोंदीमुळे मालखेड येथे झालेले त्यांचे दर्शन महत्त्वपूर्ण मानले जाते. गोगटे यांच्या या दुर्मीळ नोंदीमुळे परिसरातील सर्व पक्षीप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.