राणादादा /ओमदादासाठी पैज लावणे पडले महागात ; चौघांना अटक

0
1726
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – दिनांक 29.04.2019 रोजी 20.04 वा. उस्मानाबाद येथे 1) बाजीराव विष्णु करवर रा.राघुचीवाडी ता.जि.उस्मानाबाद 2) शंकर विठ्ठल मोरे रा.राघुचीवाडी 3) हनुमंत पाराप्पा ननवरे रा.वाघोली ता.जि.उस्मानाबाद 4) जिवन अमृतराव शिंदे रा.घाटंग्री ता.जि.उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद कोर्टाचे बाजुस शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर 40 लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातुन कोण निवडुण येणार यावर पैज लावुन बेकायदेशिर रित्या एकमेकांचे किमती वस्तुचे आमीष दाखवुन मोटार सायकल क्र. एम.एच. 24 सी. 8811 , टाटा इंडिगो चारचाकी गाडी क्र. एम.एच. 25 पी. 0010 यावर आरोपीतांनी पैज लावून जुगार खेळला आहे म्हणुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 29.04.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आनंदनगर यांनी केली असुन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.