चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

0
585
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी) 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्रभारी गटनिदेशक एच. यु. चांदूरकर यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून पुजन केले.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिवनचरित्रा विषयी डी. दहापुते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत टांगले तर आभार प्रदर्शन गजानन भडांगे यांनी केले. यावेळी संस्थेतील गणित निदेशक शहेजाद खान, शिल्प निदेशक कैलास चौधरी, सुरज चांदुरकर, एस. टी. बेहेरे, एन. एन. वसुले, के. के. सिसोदे, पी. डी. पाचपोर, पी. बी. क्षार, एस. एम. कांबळे, भुषण खेडकर, सौ. रंगारी, शेळके, वाघमारे, सौ. पळसकर, राठोड, कनोजे, सारवाण, मोहोड, सावंत यांसह प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती.