तुळजापूर तालुक्यातील जवळगा मसाई खून प्रकरणातील आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरी

365
जाहिरात

खुनाच्या गुन्हयातील आरोपीस 5 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

उस्मानाबाद :- मौजे जवळगा मसाई ता.तुळजापूर दिनांक 12.04.2016 रोजी 21.45 ते दिनांक 13.04.2016 स. 07.33 वा.चे दरम्यान भुजंग नागु वाघ यांचे शेतातील नदी जवळ भुजंग नागु वाघ रा.जवळगा मसाई ता.तुळजापूर याने सुधाकर मारुती वाघ रा. जवळगा मसाई ता.तुळजापूर यांना जिवे मारण्याचे उद्देशाने काठीने मारुन खुन केला व प्रभाकर सुधाकर वाघ यांना काठीने मारुन दुखापत केली म्हणून पोलीस स्टेशन तुळजापूर गुरनं. 120/16 कलम 302,324,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी.डी. जाधव यांनी करुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, तुळजापूर यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरचा खटला मा.श्री एस.ए.ए.आर. औटी जिल्हा व सत्र न्यायालय – 1 , उस्मानाबाद यांचे न्यायालयात पुर्ण झाला असुन सदर गुन्हयामध्ये तपास अधिकारी यांनी केलेला तपास , साक्षीदारांनी मा.न्यायालयात दिलेली साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी भुजंग नागु वाघ याने गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने दिनांक 30.04.2019 रोजी मा.श्री एस.ए.ए.आर.औटी जिल्हा व सत्र न्यायालय – 1 , उस्मानाबाद यांनी आरोपी नामे भुजंग नागु वाघ यास कलम 304- पार्ट 2 मध्ये 05 वर्षे सक्त मजुरी व 2,000/-रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.