महिला कोतवाल कडून पदाचा गैरपवापर शासनाचा जमिनीवर कब्जा – जिवंत झाडांचीही कत्तल

0
640

निलेश मेश्राम :-

कोयलारी येथिल त,सा,क्र,13 येथे गट क्र,152 ही जमीन चराई साठी मुकरर ठेवण्यात आली होती, कोतवाल बाईने पदाचा वापर करून आपल्या नावाने पटा बनविला व फेरफार करून 2014 ला जंगल तोडून धुरेपार बनविला आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे,

मौजा कोयलारी त,सा,क्र,13 मध्ये कोतवाल पदावर कार्यरत असून आपल्या पदाचा उपयोग करीत रिमा बाई वालदे यांंनी आपल्या पतीच्या नावे ती जमीन करून घेतली आहे ,राजकुमार वालदे ह्याच्या नावाने 0,74 आर एवढी जमीन नावाने लावण्यात आली आहे,प्रधानटोला ह्या गावी वन समुहीक समिती स्थापित असून जमिनीची मोजणी करताना कोणत्याही अधिकारी किंवा समितीच्या लोकांना समोर मोजणी झाली नाही,
रिमा बाई राजकुमार वालदे यांनी कोनत्याचं अधिकाऱ्यांना आमच्या समोर मोजणी करून दिली नाही ,आणि त्या ठिकाणी दोन वर्षे पूर्वी एका आदिवासी ने झुडपी जंगल तोडून जमीन काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या वक्ती ला प्रधानटोला येथील समितीने त्याला मनाई करून सांगितले कि ही जमीन चराई करिता आहे असे स्पष्ट पणे सांगितला, परंतु कोतवाल बाईने आपल्या पदाचा उपयोग करीत ती जमीन आपल्या पती राजकुमार वालदे ह्याच्या नांवाने करन घेतली,आता ह्या वर्षी सुद्धा झादांची कत्तल करीत आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी जनतेकडून मोठ्या प्रमाणात होत आहे,