चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

0
529
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ वा वर्धापन दिन सोहळा स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्र माध्यमिक शाळा येथे  उत्साहात साजरा झाला. आयटीआयमध्ये प्राचार्य सुधीर पाटबागे यांच्या हस्ते व तंत्र शाळेत मुख्याध्यापक सुनिल वानखडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य सुधिर पाटबागे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना वंदन केले. मुख्याध्यापक सुनिल वानखडे यांनी महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरवीर यांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या, पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाळला जातो असे सांगितले. यावेळी प्रभारी गटनिदेशक एच. यु. चांदूरकर, शिल्प निदेशक मारोती मर्दाने, कैलास चौधरी, गणित निदेशक शहेजाद खान, गजानन भडांगे, सुरज चांदुरकर, शेळके, वाघमारे, राठोड, कनोजे, मोहोड, सावंत, इमले यांसह इतर कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आदींची उपस्थिती होती.