वलगुड गावातील महाश्रमदानात अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, माजी खा. डॉ.पदमसिंह पाटील यांनी घेतला हिरीरीने सहभाग समस्त उस्मानाबादकरांनीही सहभागी होण्याचे आवाहन

0
710
Google search engine
Google search engine

वलगुड गावातील महाश्रमदानात अप्पर जिल्हाधिकारी

पराग सोमण, माजी खा. डॉ.पदमसिंह पाटील यांनी घेतला हिरीरीने सहभाग

समस्त उस्मानाबादकरांनीही सहभागी होण्याचे आवाहन

उस्मानाबाद, दि.2- वलगुड गावात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान आयोजित केले होते. या श्रमदान सोहळ्यात माजी खासदार डॉ.पदमसिंह पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्री.पराग सोमण, तहसिलदार विजयकुमार राऊत, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव,उमेद अभियान टीम, महिला आर्थिक विकास महामंडळाची टीम,आशा कार्यकर्त्या, विविध डॉक्टर्स, इतर तालुके व गावांमधून आलेले जलमित्र व समस्त वलगुड ग्रामस्थ या महाश्रमदान सोहळ्यात सहभागी झाले होते. हा महाश्रमदानाचा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध गावागावांमध्ये सुरु असलेल्या या श्रमदानामध्ये समस्त उस्मानाबादकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे आणि पाण्यासाठीचे आपले भविष्य सुधारण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.