लोहार्यात मुलीला पळवले तर उस्मानाबादेत महिलेचा विनयभंग

0
898
Google search engine
Google search engine

लोहारा येथे 17 वर्षीय मुलीस पळवुन नेले म्हणुन गुन्हा नोंद

लोहारा :- दिनांक 29.04.2019 रोजी 11.00 वा.सु. लोहारा येथे पिडीत मुलगी ही कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी गेली असता बळी प्रदीप कांबळे रा. उस्मानाबाद याने पिडीत मुलीस बोलावुन घेवुन पिडीत मुलीस घेवुन पळवुन नेले म्हणुन पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादवरून बळी प्रदीप कांबळे याचेविरुध्द दिनांक 02.05.2019 रोजी पेालीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2

उस्मानाबाद येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद

उस्मानाबाद :- दिनांक 02.05.2019 रोजी 21.30 वा.सु. रामनगर उस्मानाबाद येथे पिडीत फिर्यादी महिला ही तिचे मामाचे घरातील समोरच्या खोलीत टिव्ही पाहत बसली असताना जफर अखील सय्यद रा. भाग्यनगर समता कॉलनी उस्मानाबाद याने पिडीत फिर्यादी महिलेस अश्लिल बोलुन तिच्या सोबत झोंबाझोंबी करुन पिडीत फिर्यादी महिलेचा विनयभंग केला पिडीत फिर्यादी महिलेने जफर अखील सय्यद याचे तावडीतुन सुटण्यासाठी आरडाओरड केली असता पिडीत फिर्यादी महिलेची आई व आजी व शेजारील एक इसम धावत आले त्यावेळी जफर अखील सय्यद याने पिडीत फिर्यादी महिलेस माझेवर केस करती का तुला तोंड दाखवायची लायकी ठेवणार नाही असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली म्हणुन पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून जफर अखील सय्यद याचेविरुध्द भादंविचे कलम 452,354, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे