उस्मानाबाद येथे बदनामी केल्याचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद ”

0
633

उस्मानाबाद येथे बदनामी केल्याचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 01.05.2019 रोजी सायंकाळी 07.00 वाजण्यच्या सुमारास निलेश रघुनाथ शिंदे रा. भगीरथ कॉलनी कुरणे नगर उस्मानाबाद हे पायी चालत जात असताना हनुमंत चौक उस्मानाबाद येथे त्यांचे पाठीमागुन एक मोटारसायकल आली त्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने खाली उतरुन तु अमर फंडची बदनामी का करतो असे म्हणून हातातील लोखंडी गजाने निलेश शिंदे यांना मारहान करुन जखमी केले व तु उस्मानाबाद येथे राहायचे नाही अशी धमकी देवून शिवीगाळ केली. यापुर्वी अमर फंड याने निलेश शिंदे यांना दोन वेळेस धमकी दिली होती. अमर फंड याचे सांगणेवरुन दोन अज्ञात इसमांनी निलेश रघुनाथ शिंदे यांना मारहान केली म्हणुन निलेश रघुनाथ शिंदे यांचे फिर्यादवरून अमर फंड व दोन अज्ञात इसम यांचेविरुध्द दिनांक 03.05.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 324,323,504,506,109,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.