हातूर्णा-भापकी-पळसवाडा पुनर्वसन होणार लवकरच >< मे च्या अखेरेस सर्व लाभार्थाना मिळणार पट्टे – आ. डॉ. अनिल बोंडे

0
758
Google search engine
Google search engine

 

*प्रतिनिधी :-*

वरुड तालुक्यातील मौजे पळसवाडा, भापकी व हातुर्णा या पूरग्रस्त पुनर्वसन वसाहतीमध्ये नागरी सुविधांच्या कामासाठी ३ कोटी ९८ लक्ष ८० हजार ६५५ रुपये इतक्या सुधारित अंदाजपत्रकास मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या अथक प्रयत्नाने प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या पुनर्वसित गावांच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

मौजे भापकी-पळसवाडा-हातुर्णा येथील काही नागरिकांनी काम हे अतिशय मंद गतीने होत असल्याचे सांगितले होते, त्यालाच अनुसरून आ.डॉ. अनिल बोंडे यांनी तहसिल कार्यालय वरुड येथे आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार डॉ. अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी / पुनर्वसन अधिकारी श्री. हिंगोले, वरुडचे तहसिलदार श्री. हेमंत गांगुर्डे, नायब तहसीलदार श्री. शहरे, गटविकास अधिकारी श्री. बोपटे, पळसवाडा चे सचिव श्री. गावंडे व हातुर्णा – भापकी – पळसवाडा येथील नागरिक उपस्थित होते.

सन २०१६-१७ या चालू वित्तीय वर्षामध्ये मागणी क्र.सी.-६ मुख्य लेखाशीर्ष २२४५ नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य ०२, पूर, चक्रीवादळे, इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च, (९५),(०४) पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाकरिता रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, चावडी, विघुत पुरवठा, नागरी सुविधांवरील खर्च (२२४५-२२२९) योजनेतर ३१ सहायक अनुदान वेतनेत्तर या लेखाशीर्षाखाली रु. ६ कोटी ३५ लक्ष ६९ हजाराच्या रकमेची तरतूद पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे करण्यात आली होती. शासनाने ३ कोटी ९८ लक्ष ८० हजार ६५५ रुपयांच्या निधीला मंजुरात देऊन मौजा पळसवाडा, भापकी व हातुर्णा ता.वरुड जि.अमरावती या पूरग्रस्त पुनर्वसित गावातील उर्वरित नागरी सुविधांच्या कामासाठी शासन निर्णय दि. ५ जानेवारी २०१७ अन्वये अटींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी, अमरावती यांना अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर निधी वितरीत करण्याचे आदेश प्रारीत करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पुनर्वसित गावामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा प्राप्त झाली नसल्यामुळे मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून यावर्षी ३ कोटी ९८ लक्ष ८० हजार ६५५ रुपयांच्या शासकीय निधीला मान्यता मिळवून घेण्यात यश संपादन केले आहे. या निधी मार्फत मौजा भापकी येथील समाज मंदिराच्या बांधकामासाठी १७ लक्ष ३२ हजार ९०० रुपयांचा निधी तर याच गावातील अंतर्गत खडीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी १४ लक्ष ७७ हजार रुपयांचा निधी तसेच जिल्हा परिषद शाळेला वालकंपाउंड बांधकामाकरिता १२ लक्ष ४० हजार रुपयांचा निधी व स्थानिक भापकी येथील मुस्लीम, बौध्द दफणभूमीला वालकंपाउंड बांधकाम करण्याकरिता १३ लक्ष ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हातुर्णा येथे अंतर्गत खडीचे रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता २४ लक्ष ८४ हजार रुपये व सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकामाकरिता ७६ लक्ष ४३ हजार रुपये त्याचबरोबर मौजा परसवाडा येथे समाज मंदिराचे बांधकाम करणे १७ लक्ष ३२ हजार ९०० रुपये, याच गावातील अंतर्गत खडीचे रस्त्याचे बांधकाम करणे २४ लक्ष ९१ हजार तसेच अंतर्गत स्थानिक स्मशान शेडचे बांधकाम करणे ३ लक्ष ७७ हजार ५०० रुपये, सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करणे १० लक्ष ८८ हजार ७०० रुपये, वर्गखोली शाळा बांधकाम करणे ४७ लक्ष १६ हजार ६२५ रुपये, व्यायाम शाळेच्या बांधकामाकरिता १३ लक्ष २७ हजार रुपये ओ स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी ७ लक्ष २० हजार ६२० रुपये व कोंडवाड्याच्या बांधकामाकरिता ४ लक्ष ५५ हजार ४४० रुपये, ग्रामपंचायत भवन बांधकामाकरिता १० लक्ष ५९ हजार तसेच सहकारी सोसायटीच्या बांधकामाकरिता ५ लक्ष ५९ हजार २९० रुपये व अंगणवाडी बांधकामासाठी ७ लक्ष ४५ हजार ६८० रुपये व गावातील सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामाकरिता ५८ लक्ष १५ हजार रुपये शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

ह्या मे महिन्याच्या अखेरीस सर्व लाभार्थाना पट्टे वाटप व त्याना त्यांचा जागेचा ताबा देण्यात येईल, व भापकी – हातुर्णा येथील पुनर्वसन हे लवकरच साफ करून उर्वरित विकास कामे तातडीने करण्यात येईल, व समन्धित ठेकेदार हा जर काम करत नसेल तर त्याच्यावर योग्य ती कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा ची व्यवस्था लवकरच केली जाईल, हातुर्णा येथील दहा प्रकल्पग्रास्ताना येत्या पंधरा दिवसात भूखंड वाटप करणार असल्याचेही पुनर्वसन / उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांनी सांगितले, भापकी – हातुर्णा – पळसवाडा पुनर्वसन हे गेल्या कितीक वर्षावासून प्रलंबित आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ह्या गावाकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष देऊन निधी दिला. व त्याचे फलित आज भापकी पुनर्वसन पूर्ण होत आहे, पळसवाडा मध्ये लाभार्थाना पट्टे मिळत आहे. जर सदर कामे मे महिन्याच्या अखेरीस जर हि कामे पूर्ण ण झाल्यास त्या अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे हि आ. डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. यावेळी हातुर्णा – भापकी – पळसवाडा येथील नागरिकांनी आ. डॉ. अनिल बोंडे व पुनर्वसन / उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांचे आभार मानले.