रोजगार हमी योजनेच्या कुशल कामाचे मागील तीन वर्षापासुन प्रलंबित असलेला निधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश- पालकमंत्री बडोले यांच्या प्रयत्नांना यश

0
523

गोंदिया/ निलेश मेश्राम :-

गोंदिया जिल्हयामध्ये सद्या पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई असून सद्यस्थितीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कुशल भागाचा निधी 3 वर्षापासुन प्रलंबित असल्याने तसेच लोकसभेची आंचार संहिता सुरु असल्याने अनेक विकास कामांचा निधी तांत्रिक अडचणीमुळे वितरीत होत नव्हता त्यामुळे गोंदिया जिल्हयातील अनेक कामे ठप्प पडली होती. यासंदर्भात गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदर दुष्काळसदृष्य स्थितीमुळे गोंदिया जिल्हयात निर्माण झालेली परिस्थिती निकाली लावणेबाबत त्यांच्या दालनात भेट घेतली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव व रोजगार हमी योजनेचे सचिव यांना तात्काळ दालनात बोलवून गोंदिया जिल्हयातील प्रलंबित कामाबाबत व दुष्काळ सदृष्य स्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत सदर बाबींची तिव्रता विचारात घेऊन गोंदिया जिल्हयातील कुशल कामाकरिता मागील 3 वर्षापासुन प्रलंबित असलेला निधी दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्यामुळे विशेष बाब म्हणून तात्काळ अदा करणेसंदर्भात व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत सुरु करणेबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील अनेक विकास कामांना गती येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली.