पक्ष्यांसाठी पाणी – प.वि.पाटील विद्यालयाचा उपक्रम 

182

 

नेहा प्रकाश थोरात

 

जळगाव :-

दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे पाण्याचे साठे कमी होऊ लागले अपल्याप्रमाणेच पक्ष्यांनासुद्धा जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते हे जाणून या रणरणत्या उन्हात पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये व त्यांची सहजतेने तहान भागावी या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या इयत्ता 1लि च्या विद्यार्थ्यांनी ‘पक्ष्यांसाठी पाणी’ या उपक्रमाची सुरुवात केली.

प्रतीक प्रवीण मिस्त्री

 

सुमित विजय सोनवणे

सौरभ महाजन

        विद्यार्थ्यांनी आपापल्या घरावर किंवा घराजवळील झाडाजवळ टाकाऊ वस्तूंचा वापर करून पाणी साठवून ठेवले काही ठिकाणी घरटे सुद्धा तयार करण्यात आले.या त्यांच्या उपक्रमाने पक्ष्यांना चांगलाच फायदा होऊन त्यांची भूक तहान भागवली जात आहे.

‘या वर्षी एक सत्कार्य करूया , पक्षांना पाणी पाजूया’ या ब्रीदवाक्याखाली मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने उपशिक्षक योगेश भालेराव सदर उपक्रम राबवून घेत असून मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालक त्यात सहभागी होत आहेत

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।