आशोक जगदाळेंच्या संकल्पनेतून टंचाईग्रस्त गावांना दिलासा

323
जाहिरात

उस्मानाबाद – येथील कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान कडून उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावात दोन हजार लिटरच्या सुमारे बेचाळीस टाकीचे वाटप उद्दोजक तथा प्रतिष्ठाणचे संस्थापक अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यापुर्वीच आशोक जगदाळे यांच्या संकल्पनेतून तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यातील आनेक टंचाईग्रस्त गावात पाच टँकरच्या सहाय्याने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच दुष्काळाची दाहकता पाहता मागील पाच वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर व गरीब कुटूंबातील उपवर मुलामुलींचे प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत विवाह लावण्यात येत आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे मंगळवार दि.७ रोजी पहिल्यादांच गोरज मुहुर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. यापुर्वी तामलवाडी, काक्रंबा व नळदुर्ग या तीन ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे पार पडले आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावात सध्या पाणीटंचाई जाणवत असून अनेक गावांमध्ये खाजगी कुपनलिका अधिग्रहण करण्यात आले आहेत मात्र पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्याचे दिसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी अनेक गावात दोन हजार लिटरच्या पाण्याचे टाकीचे वाटप करण्याचे ठरवले या अनुषंगाने तालुक्यातील १२ गावात पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसात आणखी तीस गावात पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात येणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी सांगितले.

या गावात कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आशोक जगदाळे यांच्याकडून २ हजार लीटरच्या पाणी टाकीचे वाटप करण्यात आले आहे. बरमगाव ( बु ), पाटोदा, गौडगाव, लासोना, वडाळा, भंडारी, देवळाली, आंबेवाडी, धुत्ता, समुद्रवाणी व नितळी
तसेच पुढील काही दिवसात सारोळा, किणी, तुगाव, रुई ढोकी, मेडसिंगा, टाकळी, नांदुर्गा, मेंढा, येवती, सुंभा, कोंड, आरणी, इर्ला, दाऊतपुर, उपळा, ऊरूडा या गावासह आणखी काही गावात पाणी टाकीचे वाटप करण्यात येणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।